265 संदिग्ध रूग्णांचे स्वॅब संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:25 AM2021-02-26T04:25:35+5:302021-02-26T04:25:35+5:30
सदर स्वॅब घेण्याचे काम भरतीया रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रभाकर मुदगल यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले असून यासाठी रमेश भक्ते, राजेश ...
सदर स्वॅब घेण्याचे काम भरतीया रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रभाकर मुदगल यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले असून यासाठी रमेश भक्ते, राजेश नाईकवाडे, मनीष पाटील, शैलेश मिरा, प्रणाली खंडारे, अंकुश धुड, प्रदीप चव्हाण, प्रकाश मालगे, गज्जु कवल, पल्लवी जाधव, ज्योति सुरवाडे, शारदा साबळे, पुंडलिक देशमुख, राजन खेते, शीला वाघोडे आदिंनी कार्य केले आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
नियामाचे उल्लंघन 54 हजारांचा दंड ठाेठावला
अकोला – अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचे वाढते प्रादुर्भाव पाहता शहरात कोरोना विषणूचा होत असलेला फैलाव रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाव्दारे संयुक्तरित्या अकोला शहरामध्ये मास्क न लावणारे व सोशल डिस्टसींग नियमाचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली असून या अनुषंगाने 25 फेब्रुवारी रोजी नियामाचे उल्लंघन करणाऱ्यांवर 54 हजारांचा दंड ठाेठावण्याची कारवाई करण्यात आली
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पुर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि विशेष पथकाव्दारे आज पुर्व झोन अंतर्गत मास्कसाठी 24 नागरिकांवर आणि सोशल डिस्टसींगसाठी 4, पश्चिम झोन अंतर्गत 43 नागरिकांवर आणि सोशल डिस्टंसीगसाठी 4, उत्तर झोन अंतर्गत 13 नागरिकांवर आणि सोशल डिस्टसींगसाठी 10, दक्षिण झोन अंतर्गत 20 नागरिकांवर आणि सोशल डिस्टसींगसाठी 4 तसेच विशेष पथकाव्दारे 5 नागरिकांवर मास्क न घातल्यामुळे 5 नागरिकांवर तसेच सोशल डिस्टसींग नियमाचे उल्लंघन करणा-या 6 व्यावसायिक प्रतिष्ठांनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून महानगरपालिका प्रशासनाव्दारे गठीत करण्यात आलेल्या पाचही पथकाव्दारे एकुण 54500/- रपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
महाजनी जलकुंभ येथून दोन दिवस उशीराने पाणी पुरवठा
अकोला - वन विभाग कार्यालय रेल्वे स्टेशन रोड येथील लीकेज दुरुस्तीचे कामासाठी महाजनी जलकुंभ येथून होणारा पाणीपुरवठा दोन दिवस उशिराने करण्यात येईल त्यामुळे गिअरवॉल, सोनी कॉलोनी,चवरे प्लॉट, जुना राम नगर, न्यू भागवत प्लॉट, संघांनी गल्ली, खानदेश दूध डेअरी, बिर्ला बी, जलाराम परिसर, रामदास पेठ, मराठा नगर या भागाचा 26 फेब्रुवारी रोजी होणारा नियोजित पाणीपुरवठा 28फेब्रुवारी रोजी होईल. तसेच 27फेब्रुवारी रोजी होणारा निबंधे प्लॉट, राहुल नगर, मचींद्रा नगर, उत्तरा कॉलोनी, डोके पेट्रोल पंप, गुप्ते मार्ग ते फडके हॉस्पिटल, ज्योती नगर, सातव चौक, प्रसाद कॉलोनी, शंकर नगर ते घाटोले लेआऊट, अन्नपूर्णा अपार्टमेंट ते खेंमका टॉवर, स्वामी समर्थ भांडपूरा परिसर, आशा मिरगे ते मुखर्जी जवळील परिसरया भागाचा नियोजित पाणीपुरवठा 01 मार्च ला होईल. तसेच छोटी उमरी संपूर्ण, अष्टाविण्यक नगर, गजानन पेठ, विठ्ठल फेल, राऊतवाडी या भागाचा 28फेब्रुवारी रोजी होणारा नियोजित पाणीपुरवठा 02मार्च रोजी होईल. तरी शहरातील नागरिकांनी पाण्याचा अपव्यव टाळून अकोला महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रभारी कार्यकारी अभियंता जलप्रदाय विभाग मनपा अकोला यांनी केले आहे