छाननीत २५६ उमेदवारांचे २६७ अर्ज वैध; ८ उमेदवारी अर्ज अवैध !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:24 AM2021-07-07T04:24:32+5:302021-07-07T04:24:32+5:30
अकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया ...
अकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया मंगळवार, ६ जुलै रोजी पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये २५६ उमेदवारांचे २६७ उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले असून, ८ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या १४ आणि सात पंचायत समित्यांच्या २८ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कालावधीत ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्हयातील सातही तालुक्यात संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या १४ जागांसाठी ९६ उमेदवारांकडून १०२ उमेदवारी अर्ज आणि सात पंचायत समित्यांच्या २८ जागांसाठी १६७ उमेदवारांकडून १७३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवार ६ जुलै रोजी करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या १४ जागांसाठी ९५ उमेदवारांचे १०१ उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले असून, एक उमेदवाराचा एक उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. तसेच सात पंचायत समित्यांच्या २८ जागांसाठी १६१ उमेदवारांचे १६६ उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले असून, सात उमेदवारांचे सात उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले.
जि.प., पं.स. साठी वैध ठरलेले
असे आहेत उमेदवारी अर्ज !
जि.प.गट उमेदवार वैध अर्ज
१४ ९५ १०१
पं.स. गण उमेदवार वैध अर्ज
२८ १६१ १६६
उमेदवारी अर्ज मागे
घेण्याची मुदत १२ जुलैपर्यंत !
जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी जेथे अपील दाखल नाही तेथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १२ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्यानुषंगाने विहित कालावधीत जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या कोणत्या गटांत आणि पंचायत समित्यांच्या कोणत्या गणांत कोण कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार, याबाबतचे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतरच स्पष्ट होणार आहे.