२७ जनावरांचा जळून कोळसा

By admin | Published: January 31, 2015 12:55 AM2015-01-31T00:55:49+5:302015-01-31T00:55:49+5:30

बुलडाणा तालुक्यातील घटना; आगीत शेती उपयोगी साहित्यही भस्मसात.

27 burnt coal | २७ जनावरांचा जळून कोळसा

२७ जनावरांचा जळून कोळसा

Next

धाड (जि. बुलडाणा): येथील एका शेतकर्‍याचे शेतातील गोठय़ास २९ जानेवारी रोजी रात्री अचानक आग लागून तब्बल २७ जनावरे गोठय़ात बांधल्या जागी जळून कोळसा झाली तर तीन जनावरे गंभीर भाजली. या आगीमध्ये शेतकर्‍याचे शेती उपयोगी साहित्यासह ५ लाख ५१ हजार ४00 रुपयांचे नुकसान झाले आहे. बुलडाणा तालुक्यात येत असलेल्या धाड येथील रहिवासी असणारे शेतकरी गुलाबराव संपत गुजर याची गट नं. २८८ शेतीमध्ये असणार्‍या गोठय़ास २९ जानेवारी रोजी रात्री १0 वा. सुमारास अचानक आग लागली. या घटनेची माहिती त्यांना मिळाल्यावर त्यांच्यासह गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र तोवर संपूर्ण गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता, तरीही जळत्या गोठय़ातून नागरिकांनी होरपळलेली गाय, गोर्‍हा व एक बोकड बाहेर काढला, ते गंभीर भाजले होते. या आगीमध्ये गुलाबराव गुजर यांचे एक म्हैस, २0 मोठय़ा बकर्‍या, ६ पिल्लं जागेवरच जळून कोळसा झाले तर ५0 टीनपत्रे, दोन स्प्रिंकलर संच व इतर कृषी साहित्य व जनावरे मिळून ५ लाख ५२ हजाराचे नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनास्थळी आज सकाळी तहसीलदार दीपक बाजड, मंडळ अधिकारी शेळके, तलाठी किशोर कानडजे, धनंजय शेवाळे, गवळी व कोतवाल बापु तोटे यांनी भेट देऊन पंचनामा केला तर पशु वैद्यकीय अधिकारी पाचारणे यांनी जनावरांची उत्तरीय तपासणी केली. या घटनेत नुकसानग्रस्त शेतकर्‍यास तत्काळ आर्थिक मदतीची मागणी होत आहे.

Web Title: 27 burnt coal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.