मूर्तिजापूर तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी ..... टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:22 AM2021-01-16T04:22:29+5:302021-01-16T04:22:29+5:30
मूर्तिजापूर तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी ....... टक्के मतदान --------------------------------------- ...... मतदारांनी बजावला हक्क : ५३४ उमेदवारांचे भवितव्य सीलबंद : गोरेगावात ...
मूर्तिजापूर तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींसाठी ....... टक्के मतदान --------------------------------------- ...... मतदारांनी बजावला हक्क : ५३४ उमेदवारांचे भवितव्य सीलबंद : गोरेगावात तणाव
मूर्तिजापूर : तालुक्यातील मोहखेड व सोनोरी या दोन ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध झाल्याने २९ पैकी २७ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ...... मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याने तालुक्यात ...... टक्के मतदान झाले. दरम्यान, गोरेगाव येथे एकाच समाजातील दोन गटात किरकोळ कारणावरून वाद झाल्याने काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. २७ ग्रामपंचायतींसाठी १०७ मतदान केंद्रांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली. २७ ग्रामपंचायतींच्या २३५ सदस्यांच्या निवडणुकीसाठी २४२ पुरुष व २९२ महिला असे ५३४ उमेदवारांचे भाग्य सीलबंद झाले. २५,३९८ पुरुष व २३,९५३ महिला असे ४९,३५१ मतदार असून, यापैकी ...... पुरुष ..... महिला अशा एकूण...... मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ही मतदानप्रक्रिया पार पाडण्यात तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनात केलेल्या नियोजनानुसार ४८८ मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी तसेच १०७ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असणारी १०७ मतदान पथकांनी कर्तव्य बजावले. शुक्रवारी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० दरम्यान मतदानप्रक्रिया पार पडली. सुरुवातीला मतदानाची गती संथ होती. पहिल्या दोन तासात केवळ ५ टक्केच मतदान झाले. दुपारनंतर गती वाढल्याने १.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ३९.०२वर पोहोचली. ३.३० वाजतापर्यंत १४,२६८ पुरुष व १४,१२८ महिला, असे एकूण २८,३९६ मतदान होऊन मतदानाची टक्केवारी ५७.५४वर पोहोचली. संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ६२वर होती.
या २७ ग्रामपंचायतींसाठी झाले मतदान
पारद, भटोरी, मंगरूळ कांबे, गोरेगाव, लाखपुरी, सिरसो, दुर्गवाडा, सांगवी, टिपटाळा, हिरपूर, कवठा (खोलापूर), बपोरी, कुरूम, माटोडा, कवठा (सोपीनाथ), धामोरी बु, कार्ली, राजुरा घाटे, खांदला, धानोरा (पाटेकर), निभा, विराहीत, कंझरा, अनभोरा, जामठी बु, हातगाव, चिखली या २७ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले.