अकोला जिल्ह्यातील २७ पोलीस कर्मचारी बनणार ‘पीएसआय’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 02:14 PM2020-02-05T14:14:16+5:302020-02-05T14:14:21+5:30

२७ पैकी ६ पोलीस कर्मचारी इतर जिल्ह्यातील असून, अकोला पोलीस दलात कार्यरत आहेत.

27 police personnel to become PSI in Akola district! | अकोला जिल्ह्यातील २७ पोलीस कर्मचारी बनणार ‘पीएसआय’!

अकोला जिल्ह्यातील २७ पोलीस कर्मचारी बनणार ‘पीएसआय’!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: २0१३ मध्ये दिलेल्या विभागीय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या २७ पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मंगळवारचा दिवस आनंदाचा ठरला. या पोलीस कर्मचाऱ्यांना आता लवकरच पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती बहाल करण्यात येणार आहे. २७ पैकी ६ पोलीस कर्मचारी इतर जिल्ह्यातील असून, अकोला पोलीस दलात कार्यरत आहेत.
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या यादीसह कर्मचाºयांची संबंधित माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाने १0 फेब्रुवारीपर्यंत मागविली आहे.
पोलीस शिपाई, नाईक, हेड कॉन्स्टेबल आणि सहायक पोलीस उपनिरीक्षकांना पदोन्नती देण्यासाठी २0१३ मध्ये विभागीय परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या १५00 कर्मचाºयांची यादी जाहीर करण्यात आली.
यात २७ पोलीस कर्मचारी अकोला जिल्ह्यासोबत इतरही जिल्ह्यांमधील आहेत. १५00 कर्मचाºयांपैकी सध्या ८७५ पोलीस कर्मचाºयांना पदोन्नती देण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता केवळ पीएसआय पदावर नियुक्तीची प्रतीक्षा लागून आहे.


पदोन्नती मिळालेले पोलीस कर्मचारी
गणेश पाचपोर, विनायक देशमुख, असलम खान, प्रदीप व्यवहारे, प्रभाकर मोगरे, दिवाकर नांदगाये, भगवंत पाटील, गणेश चोपडे, संजय सोनवडणे, सुभाष दाते, दिनकर गुद्धे, अरुण गायकवाड, अशोक मिश्रा, मोहम्मद अफरोज शेख, गोपाल दातीर, सुरेश वाघ, गजानन चौधरी, चंद्रकिरण खंडारे यांचा समावेश आहे. यासोबतच इतर जिल्ह्यातील परंतु अकोल्यात कार्यरत असणाºयांमध्ये नरेंद्र पदमने, मोहम्मद रफिक, दिलीप तिवारी, प्रभाकर अंभोरे, रवींद्र मोगरे, सुषमा पराडे व दिलीप वानखेडे यांचा समावेश आहे.

 

Web Title: 27 police personnel to become PSI in Akola district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.