जिल्ह्यात २७१ सरपंच पदे महिलांसाठी आरक्षित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:35 AM2020-12-12T04:35:44+5:302020-12-12T04:35:44+5:30
अकोला: जिल्ह्यातील महिला सरपंच पदांची आरक्षण सोडत शुक्रवार, ११ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील ...
अकोला: जिल्ह्यातील महिला सरपंच पदांची आरक्षण सोडत शुक्रवार, ११ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींपैकी २७१ ग्रामपंचायतींची सरपंच पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
जिल्ह्यातील ५३२ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी २०२० ते २०२१ या कालावधीकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण इत्यादी प्रवर्गनिहाय सरपंचपदांचे आरक्षण ८ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आले. त्यानंतर महिला सरपंचपदांची आरक्षण सोडत ११ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात असून, जिल्ह्यातील २७१ ग्रामपंचायतींची सरपंच पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी ६३, अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी २३, नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) महिलांसाठी ७४ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी १११ सरपंच पदे आरक्षित करण्यात आली. त्यामुळे ५३२ ग्रामपंचायतींपैकी २७१ ग्रामपंचायतींची सरपंच पदे महिलांसाठी आरक्षित झाल्याचे जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व जिल्ह्यातील सातही तहसीलदारांच्या उपस्थितीत महिला सरपंच पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
महिला सरपंच पदांचे प्रवर्गनिहाय असे आहे आरक्षण!
तालुका अनु. जाती अनु. जमाती नामाप्र सर्वसाधारण
तेल्हारा ७ ३ ९ १३
अकोट ८ ६ १२ १७
मूर्तिजापूर ११ २ १२ १९
अकोला १४ ४ १३ १८
बाळापूर ११ १ ९ १३
बार्शीटाकळी ६ ३ ११ २०
पातूर ६ ४ ८ ११
......................................................................................................
एकूण ६३ २३ ७४ १११