पाणीटंचाई निवारणाच्या थकीत देयकापोटी २.७५ कोटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 02:59 PM2018-11-19T14:59:00+5:302018-11-19T14:59:17+5:30
अकोला : जिल्ह्यात गत उन्हाळ्यात करण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या कामांची थकीत देयके अदा करण्यासाठी शासनामार्फत २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे.
अकोला : जिल्ह्यात गत उन्हाळ्यात करण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारणाच्या कामांची थकीत देयके अदा करण्यासाठी शासनामार्फत २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. उपलब्ध निधी सोमवारी जिल्हा परिषदेला वितरित करण्यात येणार आहे.
गत उन्हाळ्यात जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानुषंगाने पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात समाविष्ट पाणीटंचाई निवारणाच्या विविध उपाययोजनांची कामे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागासह संबंधित यंत्रणांकडून करण्यात आली होती. पाणीटंचाई निवारणासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या कामांपैकी काही कामांची देयके अद्याप थकीत आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कामांची थकीत देयके अदा करण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत १२ नोव्हेंबर रोजी २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १९ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेला वितरित करण्यात येणार आहे. या निधीतून जिल्हा परिषदेमार्फत पाणीटंचाई निवारणाच्या विविध कामांची थकीत देयके अदा करण्यात येणार आहेत.
उपाययोजनानिहाय असा आहे उपलब्ध निधी!
पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांच्या कामांची थकीत देयके अदा करण्यासाठी शासनामार्फत २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. त्यामध्ये नवीन विंधन विहिरी व कूपनलिका- ७२ लाख ३५ हजार रुपये, नळ योजनांची विशेष दुरुस्ती- ५४ लाख २७ हजार रुपये, तात्पुरती पूरक नळ योजना -३६ लाख १८ हजार रुपये, टँकरद्वारे पाणी पुरवठा -९० लाख ५० हजार रुपये आणि खासगी विहिरींच्या अधिग्रहणाची देयके अदा करण्यासाठी २१ लाख ७० हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.