२७५ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना जाहीर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:53 AM2017-08-04T01:53:48+5:302017-08-04T01:55:57+5:30
अकोला : पाच वर्षांचा कालावधी संपणार्या जिल्हय़ातील २७५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ग्रामपंचायतींची प्रभाग रचना आणि आरक्षण गुरुवार, ३ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकार्यांच्या मान्यतेनंतर ग्रामपंचायतींची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

येत्या ऑक्टोबर ते फेब्रुवारी २0१८ या कालावधीत पाच वर्षांंचा कालावधी संपणार्या जिल्हय़ातील सातही तालुक्यांतील २७५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने जिल्हय़ातील २७५ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी), सर्वसाधारण प्रवर्ग आणि ५0 टक्के महिला आरक्षणाचे प्रारूप गत जुलैमध्ये जिल्हय़ातील सातही तहसील कार्यालयांमार्फत निश्चित करण्यात आले होते.
प्रभाग रचना आणि आरक्षणाच्या प्रारूपावरील आक्षेपांवर संबंधित उपविभागीय अधिकार्यांकडे सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर जिल्हय़ातील २७५ ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षणाच्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्याकडून मान्यता देण्यात आल्यानंतर ३ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायतींची प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात आले.
तहसील, ग्रा.प.मध्ये प्रभाग रचना प्रसिद्ध!
जाहीर करण्यात आलेली २७५ ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षण जिल्हय़ातील सातही तहसील कार्यालयांसह संबंधित ग्रामपंचायतींच्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहे.