जिल्ह्यात २६८ उमेदवारांचे २७६ उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:23 AM2021-07-07T04:23:25+5:302021-07-07T04:23:25+5:30

अकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सोमवार, ५ ...

276 nominations filed by 268 candidates in the district | जिल्ह्यात २६८ उमेदवारांचे २७६ उमेदवारी अर्ज दाखल

जिल्ह्यात २६८ उमेदवारांचे २७६ उमेदवारी अर्ज दाखल

Next

अकोला : जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सोमवार, ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्ह्यात २६८ उमेदवारांनी २७६ उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या १४ गटांसाठी ९९ उमेदवारांनी १०२ उमेदवारी अर्ज आणि पंचायत समित्यांच्या २८ गणांसाठी १६९ उमेदवारांनी १७४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे १४ गट आणि जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या २८ गणांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २९ जूनपासून सुरू करण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवार, ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ५ जुलै रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत ५ जुलैपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी जिल्ह्यात २६८ उमेदवारांकडून २७६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या १४ गटांसाठी ९९ उमेदवारांकडून १०२ अर्ज आणि पंचायत समित्यांच्या २८ गणांसाठी १७४ उमेदवारांकडून १७४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

उमेदवारी अर्जांची आज छाननी!

जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी जिल्ह्यात उमेदवारांकडून दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवार, ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपासून जिल्ह्यातील तालुकास्तरावर संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात होणार आहे.

तालुकानिहाय जि.प. गट आणि पं.स.गणांसाठी असे दाखल झाले उमेदवारी अर्ज

तालुका जि.प. गट उमेदवार अर्ज पं.स.गण उमेदवार अर्ज

तेल्हारा ३ १९ १९ ४ २१ २२

अकोट २ १५ १६ ४ २१ २१

मूर्तिजापूर २ १० ११ ४ २० २१

अकोला ३ २९ २९ ५ २९ २९

बाळापूर २ १२ १२ ४ २८ २८

बार्शीटाकळी १ ०८ ०९ ४ २७ २९

पातूर १ ०६ ०६ ३ २३ २४

.....................................................................................................................................

एकूण १४ ९९ १०२ २८ १६९ १७४

Web Title: 276 nominations filed by 268 candidates in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.