२,७९५ विद्यार्थ्यांनी दिली एमएचटी-सीईटी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:49 PM2019-05-14T12:49:48+5:302019-05-14T12:49:54+5:30

अकोला: अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी अभियांत्रिकी, फार्मसी, नर्सिंग प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा २ ते १३ मेपर्यंत घेण्यात आली.

2,795 students gave the MHT-CET exam | २,७९५ विद्यार्थ्यांनी दिली एमएचटी-सीईटी परीक्षा

२,७९५ विद्यार्थ्यांनी दिली एमएचटी-सीईटी परीक्षा

Next

अकोला: अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी अभियांत्रिकी, फार्मसी, नर्सिंग प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा २ ते १३ मेपर्यंत घेण्यात आली. परीक्षेला जिल्ह्यातून २,८५0 विद्यार्थ्यांपैकी २,७९५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागांतर्गत अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी अभियांत्रिकी आणि फार्मसी, नर्सिंग प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी (प्रवेशपूर्व परीक्षा) आयोजित केली होती. अकोला शहरातील दोन परीक्षा केंद्रांवर दोन शिफ्टमध्ये ही परीक्षा २ ते १३ मेदरम्यान पार शांततेत पार पडली. एक व दोन शिफ्टमध्ये ८0 व ७0 विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. परीक्षा केंद्रांवर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यामार्फत केंद्र प्रमुखांकडे जबाबदारी निश्चित करण्यात आली होती. पीसीबी, बीसीएमबी या दोन गटात एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातून एमएचटी सीईटी परीक्षेसाठी एकूण २,८५0 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २,७९५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. (प्रतिनिधी)

Web Title: 2,795 students gave the MHT-CET exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.