मागासवर्गीय वस्तीच्या २८ कोटी खर्चाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 04:20 PM2018-12-16T16:20:48+5:302018-12-16T16:21:05+5:30
अकोला : जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्तीच्या विकास कामांवर २८ कोटी रुपये खर्च करण्याला शनिवारी समाजकल्याण समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.
अकोला : जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्तीच्या विकास कामांवर २८ कोटी रुपये खर्च करण्याला शनिवारी समाजकल्याण समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. सोबतच दोन कोटी रुपये निधी गेल्या काळातील कामांसाठी खर्च करण्याचेही ठरले.
समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सदस्य सम्राट डोंगरदिवे, श्रीकांत खोणे, बाळकृष्ण बोंद्रे, महादेव गवळे, सरला मेश्राम, पद्मावती भोसले, निकिता रेड्डी, आशा एखे यांच्यासह समाजकल्याण अधिकारी योगेश जवादे उपस्थित होते.
मागासवर्गीय वस्तीच्या विकासासाठी शासनाकडून २०१८-१९ मध्ये ३० कोटी रुपये निधी प्राप्त झाला. हा निधी २०१८-२०२३ पर्यंत मंजूर कृती आराखड्यातील कामांवर खर्च केला जाणार आहे. त्यापैकी दोन कोटी रुपये गेल्या काळातील कामांच्या देयकासाठी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव समाजकल्याण अधिकारी जवादे यांनी सभेत ठेवला. त्यावर दोन कोटी रुपये निधी देण्यात आला. उर्वरित २८ कोटी रुपयांतून मागासवर्गीय वस्तीमधील विकास कामे करण्याला समितीने प्रशासकीय मंजुरी दिली. त्या निधीतून कोणती कामे, त्या कामांना किती निधी दिला जाईल, याचे नियोजन येत्या १५ दिवसांत करण्याचेही ठरले. त्याचवेळी गेल्या काळातील कामांसाठी देय असलेला निधी वेगळा काढून नव्या कामांचे नियोजन करण्याच्या मुद्यांवर समाजकल्याण अधिकारी जवादे ठाम असल्याने २८ कोटींच्या कामांचे नियोजन होणार की नाही, ही बाब आता लवकरच पुढे येणार आहे.
बियाणे वाटपाचे ३० लाख अखर्चित
समाजकल्याण विभागाने अनुसूचित जातींच्या शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या बियाणे वाटप योजनेचा ३० लाख रुपये निधी अखर्चित आहे. लाभार्थींना त्याचा उपयोगच झाला नाही. त्यामुळे हा अखर्चित निधी इतर योजनांवर खर्च करण्याच्या मुद्यांवर सभेत चर्चा झाली. सदस्यांनी शेळी वाटप योजनेचा प्रस्ताव दिला; मात्र त्या योजनेवर आधीच निधी ठेवला असल्याने इतर योजनांचा विचार करण्याचे ठरले.
१८६७ वस्त्यांचा विकास आराखडा
जिल्ह्यातील गावांमध्ये १८६७ वस्ती मागासवर्गीय समाजाच्या असल्याचे २०१८-२३ च्या विकास आराखड्यात निश्चित झाले. त्या वस्तीमधील विकास कामेही आराखड्यात ठरली आहेत. त्यासाठी लागणाºया निधीची मागणीही समाजकल्याण विभागाकडे करण्यात आली आहे.
- तालुकानिहाय वस्त्यांची संख्या
तालुका संख्या
अकोला ४१९
अकोट २५२
तेल्हारा १७८
बाळापूर २२९
पातूर २४८
बार्शीटाकळी १९१
मूर्तिजापूर ३५०