वाशिम जिल्ह्यात नवोदय परिक्षेसाठी २८८५ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 01:14 PM2018-11-18T13:14:37+5:302018-11-18T13:15:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत चालविण्यात येत असलेल्या संपूर्णत: निवासी स्वरूपाच्या वाशिम येथील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत चालविण्यात येत असलेल्या संपूर्णत: निवासी स्वरूपाच्या वाशिम येथील जवाहर नवोदय विद्यालयात सन २०१९-२० या शैक्षणिक सत्रात इयत्ता ६ वी प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षेकरीता जिल्ह्यातून २८८५ अर्ज १६ नोव्हेंबरपर्यंत प्राप्त झाले आहेत. आॅनलाईन अर्ज प्रक्रिया ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत सुरू राहणार असून, जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी अर्ज प्रक्रि या पूर्ण करण्याचे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाच्या मुख्याध्यापकांकडून करण्यात आले आहे.
जवाहर नवोदय विद्यालयासाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णत: निशुल्क आहे. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी व पालकांची स्कॅन केलेली सही, विद्यार्थ्यांचे जेपीजी फॉर्मेटमधील छायाचित्र, इयत्ता ५ वीमध्ये शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे विहित नमुन्यातील स्कॅन केली सर्टिफिकेट, या सर्टिफिकेटचा नमुना जवाहर नवोदय विद्यालयात उपलब्ध आहे. ही परीक्षा ६ एप्रिल २०१९ रोजी वाशिम जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर होणार असून परिक्षेचे हॉल तिकीट १ मार्च २०१९ पासून डाऊनलोड करता येतील. जिल्ह्यात १६ नोव्हेंबरपर्यंत वाशिम तालुक्यातून ७८८, रिसोड ६३८, कारंजा ४४०, मालेगाव ३९६, मंगरुळपीर ३६१ आणि मानोरा २०२, असे एकूण २२८५ आॅनलाईन अर्ज या प्र्रवेश प्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आहेत.