जिल्हय़ात धावताहेत २.८९ लाख वाहने!

By admin | Published: May 26, 2014 01:06 AM2014-05-26T01:06:35+5:302014-05-26T01:13:20+5:30

अकोला जिल्हय़ात वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांची संख्यासुद्धा जलद गतीने वाढत आहे.

2.8.9 million vehicles running in the district! | जिल्हय़ात धावताहेत २.८९ लाख वाहने!

जिल्हय़ात धावताहेत २.८९ लाख वाहने!

Next

अकोला: जिल्हय़ात वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांची संख्यासुद्धा जलद गतीने वाढत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत रस्त्यांची अवस्था मात्र बिकट झाली आहे. वाढती वाहने आणि दर्जाहीन रस्त्यांमुळे अपघातांची संख्यासुद्धा वाढली आहे. सद्यस्थितीत जिल्हय़ामध्ये २ लाख ८९ हजार ३६९ वाहने रस्त्यांवर धावत आहेत. २0१२-१३ या वर्षामध्ये ३१ मार्चपर्यंत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये विविध प्रकारच्या २ लाख ६९ हजार १९९ वाहनांची नोंदणी झाली आहे. २0१४ मध्ये जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये २0 हजार १७0 वाहनांची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये झाली आहे. यासोबतच जिल्हय़ातील शहर व ग्रामीण भागामध्ये इतर जिल्हय़ातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत नोंदणी झालेली विविध प्रकारची २0 हजार वाहने धावत आहेत. प्रत्येक गावात आणि घरात वाहने आहेत; परंतु वाढत्या वाहनांच्या तुलनेमध्ये जिल्हय़ातील रस्त्यांचा विकास झाला नाही. गावागावांना जोडणार्‍या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. वाढती वाहने आणि दर्जाहीन रस्त्यांमुळे अपघातांची आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्याही वाढत आहे.

Web Title: 2.8.9 million vehicles running in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.