३९ गुन्हेगार तडीपार!
By admin | Published: September 15, 2016 03:05 AM2016-09-15T03:05:40+5:302016-09-15T03:05:40+5:30
अकोला शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी विविध गुन्हे दाखल.
अकोला, दि. १४- शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी विविध गुन्हे दाखल असलेल्या ३९ गुन्हेगारांना तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी बुधवारी दिला. त्यामध्ये चार गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी व तीन गुन्हेगारांना तीन महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले, तर ३२ गुन्हेगारांना दोन दिवसांसाठी अकोला तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे. पोलीस विभागाच्या प्रस्तावानुसार पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असलेल्या ३९ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले. त्यामध्ये सिव्हिल लाइन पोलीस ठाणे अंतर्गत नीलेश सुरेश मोरे अनिकेत साजन अबगड, रामदासपेठ पोलीस ठाणे अंतर्गत शब्बीर ऊर्फ लल्लया मो.कामनवाले व पळसो बढे येथील गणेश भीमराव वाहुरवाघ या चार गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. तसेच रामदास पेठ पोलीस ठाणे अंतर्गत विक्की ऊर्फ विकास किशोर गौसर, खदान पोलीस ठाणे अंतर्गत आकाश सुरेश बर्वे व डाबकी रोड पोलीस ठाणे अंतर्गत शेख वसीम शेख कासम या तीन गुन्हेगारांना तीन महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. तर बोरगाव मंजू पोलीस ठाणे अंतर्गत ३२ गुन्हेगारांना १५ व १६ सप्टेंबर रोजी दिवसांसाठी अकोला तालुक्यातून तडीपार करण्यात येत असल्याचा आदेश उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी दिला.