अतिवृष्टीग्रस्तांच्या अनुदानासाठी ३ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:20 AM2021-07-29T04:20:14+5:302021-07-29T04:20:14+5:30
.......................... पालकमंत्री आज जिल्ह्यात अकोला : - अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे गुरुवार दि. २९ रोजी ...
..........................
पालकमंत्री आज जिल्ह्यात
अकोला : - अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे गुरुवार दि. २९ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत
ते आसेगाव बाजार ता. अकोट येथे पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू किट वाटप करतील तसेच दुपारी १२ वा. मौजे पनोरी येथे स्व. मुरलीधर आनंदा बुटे यांच्या परिवारास सांत्वनपर भेट देणार आहेत.
०००००
शिष्यवृत्ती परीक्षा ९ ऑगस्ट रोजी
अकोला- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८ वी) ही परीक्षा रविवार ८ ऑगस्ट रोजी घेण्यास मान्यता देण्यात आली होती. परंतु ८ ऑगस्ट रोजी काही जिल्ह्यात केंद्र शासनामार्फत सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या पदासाठीची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८ वी) दि. ८ ऑगस्ट ऐवजी सोमवार दि. ९ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.
०००००
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले
अकोला - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य / गळीत धान्य/ नगदी पिके सन २०२१-२२ अंतर्गत रब्बी हंगामामध्ये कडधान्य, गळीत धान्य व तृणधान्य या पिकांचे अनुदानित दराने बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारित कृषी औजारे व सिंचन साधने या बाबींचे अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी केले आहे.
....................................