३ लाख ११ हजारावर मुला-मुलींना देणार जंतनाशक गोळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 03:11 PM2018-08-08T15:11:58+5:302018-08-08T15:14:14+5:30

अकोला : आरोग्य विभागाच्यावतीने १० आॅगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली जाणार असून, या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील एकूण ३ लाख ११ हजार ४२४ मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

 3 lakh 11 thousand children and girls will give albendozole pill! | ३ लाख ११ हजारावर मुला-मुलींना देणार जंतनाशक गोळी!

३ लाख ११ हजारावर मुला-मुलींना देणार जंतनाशक गोळी!

googlenewsNext
ठळक मुद्दे१० आॅगस्ट रोजी शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य खात्याच्यावतीने जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे.या दिवशी शाळेत गैरहजर असलेल्या मुलांसाठी १६ आॅगस्ट २०१८ रोजी ‘मॉपअप’ फेरी दरम्यान जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात येईल.

अकोला : आरोग्य विभागाच्यावतीने १० आॅगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली जाणार असून, या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील एकूण ३ लाख ११ हजार ४२४ मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वर्षे वयोगटातील जवळपास ६८ टक्के मुले असून, त्यातील २८ टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परजीवी जंतांपासून धोका आहे. वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव, हे याचे प्रमुख कारण आहे. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमी दोष हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा आहे. कृमी दोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण तर आहेच, शिवाय त्यामुळे बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढही खुंटते. ‘एनएफएचएस’च्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात कुपोषणामुळे वाढ खुंटलेल्या पाच वर्षांखालील बालकांची टक्केवारी ३४.४ टक्के आहे, तसेच १५ ते १९ वर्षे वयोगटातील ३० किशोरवयीन मुलांमध्ये, तर ५६ टक्के मुलींमध्ये रक्तक्षय आढळून येतो. जंतामुळे मुलांमध्ये कुपोषण आणि रक्तक्षयाचे आजार बळावत आहेत. राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेदरम्यान १० आॅगस्ट रोजी शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य खात्याच्यावतीने जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी अंगणवाडी कर्मचारी, शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.
१६ आॅगस्टला ‘मॉपअप’ फेरी
जिल्ह्यातील ग्रामीण भागात १० आॅगस्ट रोजी जंतनाशक गोळीचे वाटप करण्याचे नियोजन आहे. तसेच या दिवशी शाळेत गैरहजर असलेल्या मुलांसाठी १६ आॅगस्ट २०१८ रोजी ‘मॉपअप’ फेरी दरम्यान जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात येईल. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभाग, अंगणवाडी, एकात्मिक महिला व बालविकास विभाग, शाळा, महाविद्यालयांशी समन्वय साधून पूर्वतयारी केली आहे.

 

Web Title:  3 lakh 11 thousand children and girls will give albendozole pill!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.