अमरावती विभागातील ३ लाख २५ हजार विद्यार्थी देणार दहावी, बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:30 PM2019-02-08T12:30:39+5:302019-02-08T12:31:50+5:30

अकोला: माध्यमिक (दहावी)च्या परीक्षेला १ लाख ७६ हजार विद्यार्थी, तर उच्च माध्यमिक (बारावी)च्या परीक्षेला १ लाख ४९ हजार असे एकूण ३ लाख २५ हजार ७१२ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत.

3 lakh 25 thousand students in the Amravati division will be given SSC, HSC examination | अमरावती विभागातील ३ लाख २५ हजार विद्यार्थी देणार दहावी, बारावीची परीक्षा

अमरावती विभागातील ३ लाख २५ हजार विद्यार्थी देणार दहावी, बारावीची परीक्षा

Next


अकोला: माध्यमिक (दहावी)च्या परीक्षेला १ लाख ७६ हजार विद्यार्थी, तर उच्च माध्यमिक (बारावी)च्या परीक्षेला १ लाख ४९ हजार असे एकूण ३ लाख २५ हजार ७१२ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. विभागामध्ये एकूण ४९२ परीक्षा केंदे्र राहतील. दहावीच्या परीक्षेला विभागातील पाच जिल्ह्यातून रेग्युलर व रिपीटर ९५ हजार ७८८ मुले तर ८0 हजार ३२५ आणि बारावीच्या परीक्षेला ८३ हजार ६३४ मुले, ६५ हजार ९४९ मुली प्रविष्ट होणार असल्याची माहिती अमरावती विभागीय मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
माध्यमिक (दहावी)ची परीक्षा १ मार्च ते २२ मार्चदरम्यान होणार आहे, तर उच्च माध्यमिक (बारावी)ची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २0 मार्चदरम्यान होणार आहे. या दोन्ही परीक्षेला अमरावती विभागातून ३ लाख २५ हजार विद्यार्थी बसले आहेत. यात सर्वाधिक विद्यार्थी अमरावती जिल्ह्यातील आहेत. अमरावती जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेला ३८ हजार ६४१, दहावीच्या परीक्षेला ४३ हजार ३९९, यवतमाळ जिल्ह्यातून ३२ हजार ८४१ आणि ४0 हजार ८८३ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. दहावीच्या परीक्षेला ९५ हजार ७८८ मुले, ८0 हजार ३२५ मुली आणि बारावी परीक्षेला ८३ हजार ६३४ मुले तर ६५ हजार ९४९ बसणार असल्याची माहितीही विभागीय मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

जिल्ह्यातून दहावीला २८ हजार, बारावीला २६ हजार विद्यार्थी
अकोला जिल्ह्यातून दहावी परीक्षेला २८ हजार ७७७ विद्यार्थी बसणार आहेत. त्यात रेग्युलर आणि रिपीटर मिळून १५,४४१ मुले, १३,३४0 मुली, बारावी परीक्षेला १४, ८६२ मुले आणि १२ हजार ६७ मुली प्रविष्ट होणार आहे.
 

 

Web Title: 3 lakh 25 thousand students in the Amravati division will be given SSC, HSC examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.