महाबीजचे ३ लाख क्विंटलच सोयाबीन बियाणे उपलब्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 03:40 PM2020-06-10T15:40:48+5:302020-06-10T15:40:56+5:30

३ लाख क्विंटलवर बियाणे बाजारात उपलब्ध केले असून, उर्वरित बियाणे पाठविण्याचे काम सुरू आहे.

3 lakh quintals of Mahabeej soybean seeds available! | महाबीजचे ३ लाख क्विंटलच सोयाबीन बियाणे उपलब्ध!

महाबीजचे ३ लाख क्विंटलच सोयाबीन बियाणे उपलब्ध!

Next

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे (महाबीज) महामंडळाने यावर्षी ४ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचे नियोजन केले आहे. प्रत्यक्षात ३ लाख क्विंटलच बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे. महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची वणवण सुरू आहे.
राज्यात सोयाबीन ४० लाख हेक्टरवर पेरणी केली जाते; पण गतवर्षी सोयाबीनचे उत्पादन घटल्याने यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पृष्ठभूमीवर महाबीजकडे ४ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. तथापि, त्यापैकी ३ लाख क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध केले आहे. राज्यात जवळपास ९ ते १० लाख क्विंटल बियाण्यांची गरज आहे. खासगी बियाणे कंपन्यांनी बाजारात बियाणे आणले आहे; परंतु खासगी कंपन्यांसह महाबीज बियाण्यांची मागणी दरवर्षी शेतकºयांकडून केली जाते. यावर्षी मात्र महाबीजच्या बियाण्यांसाठी शेतकºयांना वणवण भटकावे लागत आहे.
सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा आणि यावर्षी कोरानाचे संकट आल्याने या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी केल्याने मजूर अणि कर्मचाºयांची उपलब्धता कमी झाली परिणामी बियाणे प्रक्रिया करण्यास महाबीजला विलंब झाला. त्याचा परिणाम बियाणे उपलब्धततेवर झाला आहे. सध्या जे बियाणे उपलब्ध झाले त्या बियाण्यांची उगवणक्षमता तपासावी लागणार आहे; परंतु शेकडो शेतकºयांना महाबीजचे बियाणे मिळणे कठीण झाले आहे. उशिरा हे बियाणे उपलब्ध झाल्यास उगवणक्षमता तपासणार कधी, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.
दरम्यान, सोयाबीन बियाण्यांची कमतरता भासत असल्याने यावर्षी महाबीजने २५ हजार क्विंटल बियाणे बाहेरून खरेदी करण्यासाठची निविदा मागविली होती; परंतु बाहेरू न बियाणे घेण्याचा निर्णय महाबीजने रद्द केला आहे. सोयाबीनचे क्षेत्र यावर्षी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. म्हणूनच शेतकºयांनी घरचे बियाणे पेरणीसाठी वापरावे, असा सल्ला कृषी विद्यापीठ, कृषी विभागाने शेतकºयांना दिला आहे.

३ लाख क्विंटलवर बियाणे बाजारात उपलब्ध केले असून, उर्वरित बियाणे पाठविण्याचे काम सुरू आहे.
- अजय कुचे,
महाव्यवस्थापक (विपणन),
महाबीज, अकोला.

 

Web Title: 3 lakh quintals of Mahabeej soybean seeds available!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.