लॉकडाऊन काळात ३ हजार ७७६ शिशूंचा जन्म!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 12:49 IST2020-08-25T12:49:49+5:302020-08-25T12:49:59+5:30
लॉकडाऊनच्या काळात जिल्हा स्त्री रुग्णालयात तीन ७७६ शिशूंच्या जन्माची नोंद करण्यात आली आहे.

लॉकडाऊन काळात ३ हजार ७७६ शिशूंचा जन्म!
अकोला : लॉकडाऊनच्या काळात जिल्हा स्त्री रुग्णालयात तीन ७७६ शिशूंच्या जन्माची नोंद करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे दळणवळणाची पर्याप्त साधने उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागासह जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या गर्भवतींची संख्या घटल्याने जिल्हा स्त्री रुग्णालयातील प्रसूतीची संख्या कमी झाल्याचे दिसून येते.
जिल्हा स्त्री रुग्णालयात ग्रामीण भागातीलच नाही, तर जवळपासच्या जिल्ह्यातील गर्भवतीदेखील नियमित तपासणींसह प्रसूतीसाठी येतात; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने जिल्ह्याबाहेरून येणाºया गर्भवतींचे प्रमाण कमी झाले. शिवाय, दळणवळणाची साधने कमी असल्याने ग्रामीण भागातून येणाºया गर्भवतींना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीतही गत चार महिन्यात जिल्हा स्त्री रुग्णालयात ३ हजार ७१३ प्रसूती झाल्या आहेत. कोरोनाचा फैलाव होऊ नये या अनुषंगाने कंटेनमेन्ट झोनमधून येणाºया गर्भवतींसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मे आणि जून महिन्यात प्रसूतीचे प्रमाण कमी झाले होते, तर जुलै महिन्यात प्रसूतीचे प्रमाण वाढले आहे. सध्या लॉकडाऊनचे बहुतांश नियम शिथिल करण्यात आल्याने ग्रामीण भागासह जवळपासच्या जिल्ह्यातून प्रसूतीसाठी येणाºया गर्भवतींचे प्रमाण वाढले आहे.
लॉकडाऊनच्या काळात जिल्हा स्त्री रुग्णालयात होणाºया प्रसूतीचे प्रमाण घटले होते; मात्र आता हळूहळू वाढायला लागले आहे. कोरोनाचा संभाव्य धोका पाहता जिल्हा स्त्री रुग्णालयात आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका,
जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला