३० टक्के बसेस आगारात; ७० गावांना ‘ऑटाे’चा आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:14 AM2021-06-25T04:14:54+5:302021-06-25T04:14:54+5:30
या गावांना बस कधी सुरू होणार? शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शहरात ये-जा बंद आहे. खेड्यापाड्यातील प्रवासी संख्याही कमी ...
या गावांना बस कधी सुरू होणार?
शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शहरात ये-जा बंद आहे. खेड्यापाड्यातील प्रवासी संख्याही कमी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बसेस बंद आहे.
जिल्ह्यातील मुख्य मार्गावरील गावांना बसेसना थांबा देण्यात आला आहे; परंतु ग्रामीण भागात मुक्कामी राहणाऱ्या बसेस सुरू झाल्या नाहीत.
यामध्ये पातूर नंदापूर, पारस, खेट्री, जऊळका, धामणासह मोठ्या प्रमाणात गावांमध्ये बसेस बंद आहेत. त्यामुळे या बसेस कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रवाशांना खासगी गाड्या गच्च भरून
जिल्ह्यातील अकोट, पातूर, बाळापूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात बसेस सुरू आहे. तरी बहुतांश प्रवासी हे खासगी वाहनांचा आधार घेत आहे.
ज्या गावांमध्ये बसेस नाही किंवा कमी आहे अशा ठिकाणीही काळीपिवळी, खासगी बसेस सुरू झाल्या आहेत. प्रवाशीही या वाहनांनी प्रवास करत आहे.
सिसा, जऊळका या आडरस्त्यावरील गावांमध्ये खासगी वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक होत आहे. ही वाहनेही गच्च भरून जात आहेत.
काय म्हणतात प्रवास करणारे?
कोरोना काळाआधी गावात बस फेरी व्यवस्थित सुरू होती; परंतु कोरोना काळापासून बसफेरी बंद आहे. शहरात जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. एखाद्या वेळेस हे वाहनही मिळत नाही.
- योगेश गावंडे
गावातील बसफेरी बंद असल्याने ऑटोरिक्षाने मोठ्या गावापर्यंत जावे लागते. तेथून काळीपिवळी अथवा खासगी बस मिळते. येथून अधूनमधून बसफेरीही सुरू आहे. महत्त्वाचे काम असल्यास स्वत:च्या वाहनाने जावे लागते.
- गोपाल इंगळे
एकूण बसेस ५०
सध्या सुरू असलेल्या बसेस ३२
आगारात उभ्या बसेस २०
एकूण कर्मचारी ३२०
चालक ११७
वाहक ११४
सध्या कामावर चालक
११३
सध्या कामावर वाहक
११२