गारपीटग्रस्तांसाठी ३० कोटी वितरित

By admin | Published: May 17, 2014 07:52 PM2014-05-17T19:52:04+5:302014-05-17T20:35:47+5:30

अकोला जिल्ह्यातील २३ हजार शेतकर्‍यांना मिळणार मदतीचा लाभ; मदत निधी तालुका स्तरावर वितरित.

30 crore distributed for hailstorm affected people | गारपीटग्रस्तांसाठी ३० कोटी वितरित

गारपीटग्रस्तांसाठी ३० कोटी वितरित

Next

अकोला : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पीक नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी प्राप्त झालेला ३० कोटींचा मदत निधी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील तालुका स्तरावर वितरित करण्यात आला. जिल्हयातील २३ हजारांवर गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. गेल्या २२ फेबु्रवारी ते ११ मार्च या कालावधीत वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गहू, हरभरा, संत्रा, लिंबू , केळी आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याने, जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला. ५० टक्क्याच्यावर पीक नुकसान भरपाईपोटी शासनामार्फत गारपीटग्रस्त शेतकर्‍यांसाठी मदतीचे विशेष पॅकज जाहीर करण्यात आले. त्या अंतर्गत पीक नुकसान भरपाई म्हणून जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत वाटप करण्यासाठी ५७ कोटींच्या निधीची आवश्यकता असल्याची मागणी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे करण्यात आली होती. या पृष्ठभूमीवर पॅकेजांतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत वाटप करण्यासाठी २७ कोटींचा निधी गत महिन्यात प्राप्त झाला. हा मदत निधी प्रशासनामार्फत जिल्ह्यातील २४ हजार गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. जिल्ह्यातील उर्वरित २३ हजार गारपीटग्र्रस्त शेतकर्‍यांना मदत वाटप करण्यासाठी आणखी ३० कोटींचा निधी दुसर्‍या टप्प्यात गत गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत प्राप्त झाला. उपलब्ध झालेला हा ३० कोटींचा मदत निधी जिल्ह्यातील संबंधित गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी उपलब्ध मदत निधी शनिवार, १७ मे रोजी जिल्ह्यातील तालुका स्तरावर वितरित करण्यात आला आहे. तालुका स्तरावरून हा मदतीचा निधी संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. तालुका स्तरावर वितरित करण्यात आलेला ३० कोटींचा मदत निधी गारपीटग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सोमवार, १९ मे पासून सुरू होणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी सांगितले.

**तालुकानिहाय असा वाटप करण्यात आला मदतनिधी!

तालुका                निधी

अकोला                ५,५०,७१,६१९

बार्शीटाकळी          ७,२०,४८,३६२

तेल्हारा                   ७३,४२,०३८

बाळापूर               ४,२८,५६,७७०

पातूर                   ५,६९,२३,३४१

मूर्तिजापूर            ६,५७,५७,८७०

एकूण                  ३०,००,००,०००

Web Title: 30 crore distributed for hailstorm affected people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.