जीएमसीत म्युकरमायकोसिसच्या ३० यशस्वी शस्त्रक्रिया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:14 AM2021-05-31T04:14:51+5:302021-05-31T04:14:51+5:30
४६ रुग्णांवर उपचार सुरू सर्वोपचार रुग्णालयात सद्यस्थितीत म्युकरमायकोसिसच्या ४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील काही रुग्णांची स्थिती गंभीर असल्याने ...
४६ रुग्णांवर उपचार सुरू
सर्वोपचार रुग्णालयात सद्यस्थितीत म्युकरमायकोसिसच्या ४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील काही रुग्णांची स्थिती गंभीर असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, तर काही रुग्णांना केवळ औषधोपचार सुरू असल्याची माहिती आहे.
अशी आहे स्थिती
वैद्यकीय तपासणी - ७३
शस्त्रक्रिया - ३०
डिस्चार्ज - १४
नागपूर संदर्भीत - १२
सायनस आणि दातांच्या शस्त्रक्रिया
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने सायनस आणि दातांमध्ये समस्या उद्भवत असल्याचे आढळून आले. या दोन्ही भागांवरील बुरशीचा फैलाव होऊ नये, यासाठी शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
सर्वोपचार रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत ३० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ज्या रुग्णांवर अकोल्यात उपचार शक्य नाही, अशांना नागपूर येथे संदर्भीत केले जात आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळताच रुग्णांनी पोस्ट कोविड ओपीडीला भेट द्यावी.
- डॉ. दिनेश नैताम, वैद्यकीय उपअधीक्षक, जीएमसी, अकोला