३0 शिक्षकांची उपशिक्षणाधिकारी पदावर पदोन्नती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:14 PM2019-07-23T12:14:30+5:302019-07-23T12:14:43+5:30
अकोला: तांत्रिक सेवा गट क श्रेणी २ (शिक्षण) संवर्गातून महाराष्ट्र शिक्षण सेवा ग ब (प्रशासन शाखा) उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर तात्पुरत्या स्वरूपात खुल्या प्रवर्गातून राज्यातील ३0 शिक्षक, सहायक शिक्षकांना पदोन्नती दिली आहे.
अकोला: तांत्रिक सेवा गट क श्रेणी २ (शिक्षण) संवर्गातून महाराष्ट्र शिक्षण सेवा ग ब (प्रशासन शाखा) उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर तात्पुरत्या स्वरूपात खुल्या प्रवर्गातून राज्यातील ३0 शिक्षक, सहायक शिक्षकांना पदोन्नती दिली आहे. याची यादी शिक्षण आयुक्तालयातून जाहीर करण्यात आली.
राज्यातील अनेक विभागांमध्ये उपशिक्षणाधिकारी ही पदे रिक्त होती. या पदांवर सहायक शिक्षक, शिक्षकांना पदोन्नती देण्याचे विभागीय पदोन्नती समिती निश्चित केले होते. त्यानुसार त्याला मान्यतासुद्धा देण्यात आली. त्यानुसार विदर्भातील सहायक शिक्षक पूनम प्रेम म्हस्के (जि.प. चंद्रपूर), नामदेव गणपत गायधने (जि.प. भंडारा), विश्वनाथ हरी जोग (जि.प. चंद्रपूर), अविनाश किसनराव देशमुख (जि.प. चंद्रपूर), मोहन देवीदास पवार (जि.प. चंद्रपूर),ज्योती पद्मवार (जि.प. यवतमाळ), मोहुद्दीन साबीर शेख (जि.प. यवतमाळ) बी.के. देशमुख (जि.प. यवतमाळ), वेंकटचारी रामाचारी आवेली (जि.प. गडचिरोली), हेमराज कचरू दहीवले (जि.प. भंडारा), बाबुराव बळीराम पारधी (जि.प. गोंदिया), दिलीप खुशाल तायडे (जि.प. यवतमाळ), पी.एन. करनकोटे (जि.प. भंडारा), प्रकाश तुळशीराम अंधारे (जि.प. अकोला), ए.एम. पाटील (जि.प. बुलडाणा), व्ही.एम. बागडे (जि.प. बुलडाणा) आदींना उपशिक्षणाधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. ३0 सहायक शिक्षकांपैकी विदर्भातील १७ शिक्षकांना तर मराठवाड्यातील १३ शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)