हिवरखेडमध्ये ३0 हजारांचे चंदन जप्त
By admin | Published: October 14, 2014 01:22 AM2014-10-14T01:22:53+5:302014-10-14T01:22:53+5:30
हिवरखेड पोलिसांची कारवाई.
Next
हिवरखेड (तेल्हारा, जि. अकोला): स्थानिक पोलिसांनी सोमवारी मध्यप्रदेशातील एका इसमाकडून ३0 हजार रुपयांचे चंदन जप्त करून त्याला वनविभागाच्या ताब्यात दिले. पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनूसार, अब्दुल वसिम अब्दुल करीम (रा. बर्हानपूर, मध्यप्रदेश) हा त्याच्याकडील पिशवित १५ किलो चंदन (किंमत अंदाजे ३0 हजार रुपये) घेऊन जात होता. पोलिसांनी संशयावरून त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे चंदन आढळून आले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर सायंकाळी वनविभाग अकोला यांच्या ताब्यात देण्यात आले.