अकोला जिल्ह्यातील ३०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या लवकरच बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 10:44 AM2020-07-19T10:44:31+5:302020-07-19T10:45:01+5:30
शासनाने दिलेल्या आदेशानंतर बदल्या करण्याची प्रक्रिया सुरू असून, १५ टक्के कर्मचाºयांच्या प्रशासकीय कारणावरून बदल्यांचा पोळा लवकरच फुटणार आहे.
- सचिन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला पोलीस प्रशासनात कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील सुमारे ३०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. शासनाने दिलेल्या आदेशानंतर बदल्या करण्याची प्रक्रिया सुरू असून, १५ टक्के कर्मचाºयांच्या प्रशासकीय कारणावरून बदल्यांचा पोळा लवकरच फुटणार आहे.
पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया मे महिन्यात पूर्ण झाल्यानंतर बदल्यांची यादी जाहीर करण्यात येते; मात्र यावर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बदली प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती; मात्र जुलै महिन्यात अधिकारी व कर्मचाºयांच्या प्रशासकीय कारणावरून १५ टक्के बदल्या करण्याचा आदेश आल्यानंतर आता या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, जिल्ह्यातील ३०० पोलीस कर्मचाºयांच्या बदल्यांची यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी फेब्रुवारी महिन्यातच एकाच ठिकाणी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाºया कर्मचाºयांची यादी मागविली होती. यावेळी ३ पर्यायी ठिकाण बदल्यांसाठी मागण्यात आले होते; मात्र यानुसार काही कर्मचारी गुंतागुंत करीत असल्याचे गावकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचाºयांना पाच पर्यायी ठिकाण देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बदली प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन सुरू होताच कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर राज्य शासनाने बदल्या स्थगित केल्या होत्या. त्यानुसार अकोला पोलीस दलातील कर्मचाºयांच्या बदल्याही रखडल्या होत्या; मात्र आता त्याच माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनीही पोलीस कर्मचाºयांच्या बदल्यांची यादी सुरू करण्याचे काम जोरात सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा पोलीस दलातील ३०० पोलीस कर्मचाºयांच्या बदल्या होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
मीना यांनी काढली होती मक्तेदारी मोडीत
शहरातील पोलीस ठाणे तसेच काही महत्त्वाच्या ठिकाणांवर काही मोजके पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. वर्षानुवर्ष त्यांचेच या पदावर राज्य असून, अशा कर्मचाºयांची मक्तेदारी मोडीत काढण्याचे काम तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी केले होते. त्यानुसारच बदल्या होण्याची आशा प्रामाणिक पोलिसांना असून, आता बदल्यांच्या यादीकडे लक्ष लागले आहे.
आठ जणांची खुफिया कर्मचारी म्हणून नियुक्ती
पोलीस प्रशासनात कार्यरत असलेल्या ८ पोलीस कर्मचाºयांची खुफिया कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रत्येक पोलीस कर्मचाºयास एका तालुक्याची जबाबदारी देण्यात आली असून, त्यांनी त्यांच्या तालुक्याची खुफिया माहिती ठेवणे तसेच त्याचा अहवाल सादर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.