सुरळीत विजेसाठी अकोला परिमंडलातील ३ हजार कर्मचारी कर्तव्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:41 PM2021-05-10T16:41:01+5:302021-05-10T16:41:32+5:30
Msedcl News : सुरळीत विजेसाठी अकोला परिमंडलातील ३ हजार कर्मचारी कर्तव्यावर आहेत.
अकोला: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्याा पाार्श्वभूमीवर कोव्हीड रूग्णालयासह सर्व अत्यावशक सेवा तसेच ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी अकोला परिमंडलातील महावितरणचे सुमारे ३ हजार अधिकारी ,अभियंते व कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या वेवचे रूद्रावतार बघता ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व शासकीय तसेच खाजगी रूग्णालये,कोव्हीडचे विशेष कक्ष,विलगीकरन कक्ष याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अत्यावशक सेवांना अखंडित वीज पुरवठा मीळेल याची विशेष खबरदारी महावितरणकडून घेतल्या जात आहे.या शिवाय अत्यावशक सेवेसाठी तत्काळ नविन वीज जोडणी देण्याची प्रक्रीयाही महावितरणकडून राबविली जात आहे.
लॉकडाऊनमध्ये नागरीकांना घरी बसणे सुरळीत वीज पुरवठ्यामुळेच शक्य होत आहे.त्यातच आता दिवसेंदिवस ऊन्हाचा पारा वाढत आहे.सर्वच नागरिक घरी असल्याने टिव्हीसह विविध विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर वाढला आहे.त्यामुळे काही ठिकाणी विविध कारणाने वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरणचे कर्मचारी तातडीने धाव घेऊन तो पूर्ववत करत आहेत. कोरोनाच्या संकटातही महावितरणचे कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करत आहेत.
अकोला परिमंडलाअंतर्गत अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात महावितरणचे ३०० अभियंते,१५७१ जनमित्र, २७९ यंत्रचालक,३७१ बाह्यस्त्रोत कर्मचारी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी धडपडत आहे.यासोबतच तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सहाय्यासाठी व्यवस्थापनातील ४५१ पेक्षा अधिक अतांत्रिक कर्मचारीही आपली सेवा बजावत आहे. कोरोनाचे संकट बघता महावितरणचे कर्तव्य बजावतांना गेल्या वर्षभरात अकोला २४३ कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.सध्यास्थितीत ५९ कर्मचारी हे कोरोना बाधित असून ०३ कर्मचाऱ्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.तरीही महावितरण ग्राहकांच्या सेवेत आहे.वीज ग्राहकांनी कोरोना विरूध्दच्या या लढाईत मास्क,सामाजिक दुरीचे अंतर राखत शासनांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे.