काटेपूर्णा प्रकल्पात ३०.४० टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:14 AM2021-06-20T04:14:42+5:302021-06-20T04:14:42+5:30

अकोला : पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे ; परंतु अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ...

30.40% water storage in Katepurna project | काटेपूर्णा प्रकल्पात ३०.४० टक्के जलसाठा

काटेपूर्णा प्रकल्पात ३०.४० टक्के जलसाठा

Next

अकोला : पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे ; परंतु अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये कमी जलसाठा आहे. काटेपूर्णा प्रकल्पात ३०.४० टक्के जलसाठा आहे.

दमदार पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या !

अकोला : मान्सूनचे आगमन लवकर झाले ; मात्र जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहे. काही दिवसा आधी केवळ २ टक्केच पेरण्या झाल्याची नोंद करण्यात आली होती.

३७ शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सहभाग

अकोला : येथील डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत शेतीच्या शाश्वततेसाठी शेतकऱ्यांचा महासंघ स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये पश्चिम वऱ्हाडातील ३७ शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सहभाग आहे.

जमिनीत गंधक अन्नद्रव्यांचा अभाव

अकोला : शेतकऱ्यांकडून कपाशी या पिकाला नत्र, स्फुरद व पालाश या खतांचा प्रामुख्याने वापर केला जातो ; परंतु दुय्यम अन्नद्रव्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. अखिल भारतीय समन्वयीत सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्पांतर्गत जिल्ह्यामध्ये सर्वेक्षण केले असता गंधक या अन्नद्रव्यांचा विशेष अभाव जमिनीत दिसून आला असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.

नागपूर-नाशिक रात्रीची फेरी सुरू

अकोला : गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने निर्बंधांमध्ये सूट मिळत आहे. त्यामुळे बसेसची संख्याही वाढली आहे. नागपूरवरून नाशिकसाठी सुटणारी व अकोला बसस्थानकावरून रात्री १.३० वाजताची फेरी पुन्हा पूर्ववत सुरू झाली आहे.

Web Title: 30.40% water storage in Katepurna project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.