राज्यातील जिल्हा रूग्णालयांसाठी ३१ सीटी स्कॅन मशीनची होणार खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 02:53 PM2019-03-27T14:53:14+5:302019-03-27T14:53:33+5:30

सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील ३६ पैकी ३१ जिल्ह्यांमध्ये नवीन सीटी स्कॅन मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

31 CT scan machines will be purchased for district hospitals in the state | राज्यातील जिल्हा रूग्णालयांसाठी ३१ सीटी स्कॅन मशीनची होणार खरेदी

राज्यातील जिल्हा रूग्णालयांसाठी ३१ सीटी स्कॅन मशीनची होणार खरेदी

Next

अकोला: राज्यभरातील सर्वोपचार रूग्णालये, जिल्हा स्त्री रूग्णालयांसह आरोग्य विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या संस्थांमध्ये सर्वसामान्य रूग्णांवर उपचार करताना अनेकदा सीटी स्कॅन मशीन नादुरुस्त असल्याचा अनुभव येतो. यामुळे गोरगरीब रूग्णांची परवड होते. ही बाब लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील ३६ पैकी ३१ जिल्ह्यांमध्ये नवीन सीटी स्कॅन मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ७ कोटी ८३ लक्ष रुपये निधीतून मशीनची खरेदी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
खासगी रूग्णालयांमधील उपचार अत्यंत खर्चिक असल्यामुळे गोरगरीब रूग्ण उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल होतात. आजाराचे अचूक निदान करण्यासाठी याठिकाणी सीटी स्कॅन मशीनचा वापर करणे अपेक्षित असला तरी बहुतांश रूग्णालयांमधील मशीन नादुरुस्त असल्याची सबब पुढे केली जाते. त्यामुळे नाईलाजाने रूग्णांना खासगी हॉस्पीटलमध्ये जाऊन निदान करावे लागते. अर्थात, दोन-दोन महिने सीटी स्कॅन मशीन नादुरुस्त राहत असल्याने संबंधित रूग्णालयांच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित होतात. संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती असून जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाचे व खासगी हॉस्पीटलचे साटेलोटे असल्याच्या शंक ा उपस्थित केल्या जातात. ही बाब गंभीरतेने घेत शासनाने ३६ पैकी ३१ जिल्ह्यांसाठी ३१ सीटी स्कॅन मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गोरगरीब रूग्णांना दिलासा मिळेल,अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.

विशिष्ट कंपनीला फायदा नको!
नवीन सीटी स्कॅन मशीनची खरेदी करताना संबंधित जिल्ह्यातील रूग्णालयांमध्ये मशीन उपलब्ध आहे किंवा नाही,याची खातरजमा करण्याचे निर्देश आहेत. त्यानंतर मशीन तांत्रिक दृष्ट्या अद्ययावत असल्याची खात्री केल्यानंतर या निकषाचा एका विशिष्ट कंपनीला फायदा होणार नाही,याची काळजी घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत.

देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदारावर
अनेकदा जिल्हा सामान्य रूग्णालयांमध्ये सीटी स्कॅन मशीन नादुरुस्त झाल्यानंतर ती लवकर दुरुस्त केली जात नाही. त्यामुळे नवीन मशीनची खरेदी करताना देखभाल दुरूस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदावर सोपविण्यात आली आहे.

 

Web Title: 31 CT scan machines will be purchased for district hospitals in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.