३१ कर्मचारी गायब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 02:24 AM2017-08-12T02:24:13+5:302017-08-12T02:24:27+5:30

अकोला : महापालिकेच्या कामचुकार तसेच लेटलतिफ  कर्मचार्‍यांमुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित होते. कामचुकार  कर्मचार्‍यांबद्दलच्या तक्रारी ध्यानात घेता, महापौर विजय अग्रवाल  यांनी शुक्रवारी सर्व विभागांची अचानक झाडाझडती घेतली. यावेळी  चक्क ३१ कर्मचारी गायब असल्याचे निदर्शनास आले. संबंधित  कर्मचार्‍यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे निर्देश महापौर  अग्रवाल यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. 

31 employees missing! | ३१ कर्मचारी गायब!

३१ कर्मचारी गायब!

Next
ठळक मुद्देमहापौरांनी घेतली झाडाझडती एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिकेच्या कामचुकार तसेच लेटलतिफ  कर्मचार्‍यांमुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित होते. कामचुकार  कर्मचार्‍यांबद्दलच्या तक्रारी ध्यानात घेता, महापौर विजय अग्रवाल  यांनी शुक्रवारी सर्व विभागांची अचानक झाडाझडती घेतली. यावेळी  चक्क ३१ कर्मचारी गायब असल्याचे निदर्शनास आले. संबंधित  कर्मचार्‍यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे निर्देश महापौर  अग्रवाल यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. 
महापालिकेच्या आस्थापनेवर २ हजार २00 पेक्षा अधिक कर्मचारी  कार्यरत आहेत. यापैकी स्वच्छता विभागात ७४८ सफाई कर्मचारी  कार्यरत आहेत. सदर कर्मचारी दिवसभर बाहेर असले, तरी उर्वरित  कर्मचार्‍यांची संख्या पाहता प्रशासकीय कामकाज करताना एवढय़ा  मोठय़ा प्रमाणातील मनुष्यबळाचा अभाव दिसून येतो. प्रशासनाने  झोननिहाय कार्यालयांचे गठन केले असून, याठिकाणी किमान २0  कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असले तरी महा पालिकेच्या वतरुळातून उर्वरित कर्मचारी नेमके जातात कोठे, असा  सवाल उपस्थित होतो. मनपाच्या जलप्रदाय, सार्वजनिक बांधकाम,  नगररचना विभाग, सामान्य प्रशासन विभाग, जन्म-मृत्यू नोंदणी  विभाग, लेखा व वित्त विभागासह आरोग्य व स्वच्छता विभागासह इ तर ठिकाणी बोटावर मोजता येणारे कर्मचारी कार्यरत असल्याचे  दिसून येते. कामचुकार कर्मचारी गायब असल्यामुळे त्यांच्या  कामकाजाचा अतिरिक्त ताण इतर कर्मचार्‍यांना सहन करावा लागतो.  यासंदर्भात कर्मचार्‍यांच्या तक्रारी लक्षात घेता महापौर विजय  अग्रवाल यांनी शुक्रवारी अचानक सर्व विभागांची झाडाझडती घे तली. सामान्य प्रशासन विभागातील हजेरी पुस्तिका, कर्मचार्‍यांनी  सादर केलेले रजेचे अर्ज, त्यांच्या नोंदी तसेच हलचल पुस्तिक ा त पासल्या असता अनेक कर्मचारी नियमांना धाब्यावर बसवून गायब  झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. यावेळी स्थायी समिती सभाप ती बाळ टाले, नगरसेवक अमोल गोगे, दिलीप मिश्रा उपस्थित होते. 

कर्मचार्‍यांची बनवाबनवी उघड
महापौर विजय अग्रवाल यांनी विविध विभागातील हजेरी पुस्तिका त पासल्या असता, त्याचा गैरवापर होत असल्याचे लक्षात आले. हजेरी  पुस्तिकेवरील नावासमोरच्या जागेवर कोणतीही नोंद न करणार्‍या  कर्मचार्‍यांनी कारवाईपासून वाचण्यासाठी रजेचे अर्ज सादर केल्याचे  दिसून आले. असे अर्ज प्रशासनाने मंजूर केल्यानंतर रजा घेता येते.  यातील बहुतांश अर्जावर प्रशासनाने कोणताही शेरा नमूद केला  नसल्याचे समोर आले.

कामचुकार कर्मचार्‍यांची नावे उघड झाली आहेत. त्यांचे एक  दिवसाचे वेतन कपात करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले आहेत.  यानंतर सेवापुस्तिकेत नोंदी कराव्या लागतील, याचे कर्मचार्‍यांनी  भान ठेवावे.
-विजय अग्रवाल, महापौर

Web Title: 31 employees missing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.