३२ पोलिस कर्मचारी तात्पुरते पीएसआय

By Admin | Published: September 26, 2014 01:52 AM2014-09-26T01:52:02+5:302014-09-26T01:52:02+5:30

अकोला जिल्ह्यातील ३२ सहायक पोलिस उपनिरीक्षक व पोलिस हवालदार यांची पोलिस उ पनिरीक्षक पदावर तात्पुरती नियुक्ती.

32 PSI temporary PSI | ३२ पोलिस कर्मचारी तात्पुरते पीएसआय

३२ पोलिस कर्मचारी तात्पुरते पीएसआय

googlenewsNext

अकोला: पोलिस दलातील ३२ सहायक पोलिस उपनिरीक्षक व पोलिस हवालदार यांची त्यांचे संम तीनुसार व ज्येष्ठतेनुसार तात्पुरत्या स्वरूपात २ महिन्यांच्या कालावधीसाठी पोलिस उपनिरीक्षक पदावर पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी नियुक्ती केली. पीएसआयपदी नियुक्ती मिळालेल्या कर्मचार्‍यांमध्ये एएसआय योगिता राजेंद्र फरकाडे, बबन रामकिशोर दुबे, रूस्तम फकिरा पिंजरकर, जगदीश श्रीराम जायभाये, अनंत भिकाजी भुईभार, ता पाबाई राजपूत, राजू बळीराम अवताडे यांची तर पोलिस हवालदार देवीदास रामदास ग्यारल, गोवर्धन नारायण गोंडचवर, राजेंद्र काशिनाथ इंगळे, प्रजा खुशालराव शेगावकर, रामराव मरी मोरे, प्रेमानंद सिरसाट, राम पुरुषोत्तम पांडे, गंगाधर पंडित, दिनकर गुडदे, मधुकर महादेव महल्ले, सुनील भीमराव मुसळे, श्रीकृष्ण श्यामराव इंगळे, दीपक प्रल्हाद पुंडगे, बाळकृष्ण गोविंदा पवार, संतोष बापूराव घुगे, ओंकार नारायण मुळे, निसारखाँ मुस्तफाखाँ, संजय श्रीहरी अंभोरे, शेरअली लियाकतअली, अनिल रामकृष्ण रोठे, देवीदास गोविंदराव येऊल, गणपत शिवराम गवळी, उमेशचंद्र रमेश सोळंके, राजेंद्र रामराव वानखडे, गणपत गीते यांची पीएसआयपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी सण-उत्सवाच्या काळासाठी या नियुक्त करण्यात आलेल्या अधिकार्‍यांना जादा अधिकार देण्यात आले आहेत. परंतु जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशामध्ये ही नियुक्ती स्थानिक व निव्वळ स्वरूपाची असल्याचे म्हटले आहे.

Web Title: 32 PSI temporary PSI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.