मूर्तिजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणात ३२ टक्के जलसाठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:16 AM2021-05-17T04:16:52+5:302021-05-17T04:16:52+5:30
गेल्या तीन वर्षांपासून धरणात शंभर टक्के जलसाठा जमा होत असल्याने पाणीटंचाईची समस्या जाणवत नाही. धरणात ३२ टक्क्यांच्या ...
गेल्या तीन वर्षांपासून धरणात शंभर टक्के जलसाठा जमा होत असल्याने पाणीटंचाईची समस्या जाणवत नाही. धरणात ३२ टक्क्यांच्या वर जलसाठा उपलब्ध असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यंदा सिंचनासाठी मुबलक पाणी धरणातून मिळाल्याने शेतकऱ्यांनी गहू, हरभरा आणि इतर उन्हाळी पिके घेतली. गतवर्षी मे महिन्यात ३५ टक्के जलसाठा उपलब्ध होता. सद्य:स्थितीत धरणात एकूण २७.७८ एम. एम. क्युसेक एवढा जलसाठा उपलब्ध आहे.
------------------
धरणात पाणीसाठा जरी मुबलक उपलब्ध असला, तरी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा. यावर्षी जून व जुलै महिन्यात बरेच कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने पुढील वर्षी कर्मचाऱ्यांची वानवा जाणवणार आहे. यावर्षी धरणाच्या रस्त्यावर मुरूम व खडीकरणाचे काम करण्यात आले आहे. धरणाकरिता सिक्युरिटी गार्डची नियुक्ती करण्याबाबत विचार सुरू आहे.
-नीलेश घ्यारे,
अभियंता, महान.