३२४८ मेट्रिक टन हरभरा साठा मंजूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 10:36 AM2020-06-14T10:36:19+5:302020-06-14T10:36:41+5:30

मजुरांना दोन महिन्यांचा मोफत हरभरा वितरित करण्यासाठी शासनामार्फत ३ हजार २४८ मेट्रिक टन हरभºयाचा साठा मंजूर करण्यात आला आहे.

3248 MT Gram stock sanctioned! | ३२४८ मेट्रिक टन हरभरा साठा मंजूर!

३२४८ मेट्रिक टन हरभरा साठा मंजूर!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमीवर केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी राज्यात शिधापत्रिका नसलेल्या विस्थापित मजुरांना प्रतिमहा प्रत्येकी ५ किलो तांदुळासोबत १ किलो हरभऱ्याचे मोफत वितरण सुरू करण्यात आले आहे. शिधापत्रिका नसलेल्या मजुरांना दोन महिन्यांचा मोफत हरभरा वितरित करण्यासाठी शासनामार्फत ३ हजार २४८ मेट्रिक टन हरभºयाचा साठा मंजूर करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू असलेल्या ‘लॉकडाऊन’च्या पृष्ठभूमीवर केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत शिधापत्रिका नसलेल्या विस्थापित मजुरांना मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिमहा प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत १९ मे रोजी घेण्यात आला. तसेच शिधापत्रिका नसलेल्या मजुरांना मोफत तांदुळासोबतच प्रतिमहा प्रत्येकी १ किलो मोफत हरभरा वितरित करण्यासाठी मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता ३ हजार २४८ मेट्रिक टन हरभºयाचा साठा पुरवठा विभागाच्या २७ मे रोजीच्याआदेशानुसार मंजूर करण्यात आला. मंजूर करण्यात आलेला हरभरा साठा राज्यातील जिल्हास्तरावर वितरित करण्यात आला असून, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिधापत्रिका नसलेल्या मजुरांना प्रत्येकी पाच किलो तांदुळासोबत एक किलो हरभºयाचे वितरण सुरू करण्यात आले. त्यामध्ये मे व जून या दोन महिन्यातील एकत्र मोफत तांदूळ व हरभºयाचे वितरण करण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत शिधापत्रिका नसलेल्या मजुरांना मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीत प्रतिमहा व प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ आणि एक किलो हरभरा मोफत वितरित करण्यात येत आहे. दोन महिन्यांतील मोफत धान्याचे वितरण जून महिन्यात एकत्र करण्यासाठी तांदूळ व हरभºयाचा साठा उपलब्ध झाला आहे.
- बी. यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: 3248 MT Gram stock sanctioned!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला