पश्‍चिम विदर्भात ३२६ दुकांनाना निविष्ठा विक्री बंदचे आदेश!

By admin | Published: July 14, 2015 01:57 AM2015-07-14T01:57:35+5:302015-07-14T01:57:35+5:30

२१७ क्विंटल बियाणे, १७.५३ मेट्रिक टन खते, १२७ लीटर बोगस कीटकनाशकांचा साठा जप्त.

326 shops in western Vidarbha sell orders for sale! | पश्‍चिम विदर्भात ३२६ दुकांनाना निविष्ठा विक्री बंदचे आदेश!

पश्‍चिम विदर्भात ३२६ दुकांनाना निविष्ठा विक्री बंदचे आदेश!

Next

अकोला : पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ात बोगस बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके विक्री करणार्‍या ३२६ दुकानांना निविष्ठा विक्री बंदचे आदेश कृषी विभागाने (गुणवत्ता नियंत्रण) दिले आहेत. यात सर्वाधिक ३१३ बोगस बियाणे विक्री करणार्‍या दुकानांचा समावेश आहे. यातील अनेकांवर फौजदारी कारवाई केली जात असून, पाच दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत. राज्यात जवळपास अठराशेच्यावर दुकानांची निविष्ठा विक्री बंद करण्यात आली आहे. विदर्भात बोगस बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. बीटी कापूस, सोयाबीन व इतर बियाण्यांपासून दुप्पट उत्पादन होत असल्याचा प्रचार करू न बोगस बियाणे विकण्यात आले आहे. रासायनिक खतामध्ये मीठ आढळले आहे. बोगस कीटकनाशकेही शेतकर्‍यांना विकण्याचा धंदा या भागात जोरात सुरू आहे. या पृष्ठभूमीवर यंदा कृषी विभागाने भरारी पथकांची निर्मिती केली आहे. या पथकाने जून २0१५ अखेरपर्यंत ३२६ निविष्ठा विक्री करणार्‍या दुकानांवर कारवाई केली आहे. ४८ बोगस बियाणे, १५५ बोगस रासायनिक खते, तर बोगस कीटकनाशके विक्री करणार्‍या ७९ जणांवर न्यायालयात खटले भरण्यात आले असून, बोगस बियाणे विक्री करणार्‍या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, बोगस खते विकणार्‍या ३ जणांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाच दुकानांचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत. पश्‍चिम विदर्भात २१७ क्विंटल बियाणे जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत साडेतीन लाख रूपये आहे. १७.५३ मेट्रिक टन खताची किंमत ८.३२ लाख, तर बोगस कीटकनाशके ६६ हजार रुपयांची आहेत. ही किंमत कमी वाटत असली तरी, बोगस निविष्ठांची मोठय़ा प्रमाणात या भागात विक्री झाली आहे. अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक यांनी विभागात यंदा दक्षता घेण्यात घेऊन, बोगस कृषी निविष्ठा विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली असल्याचे स्पष्ट के ले असून बियाणे विक्री करणार्‍या सर्वाधिक ३१३ दुकानांना निविष्ठा विक्री बंदचे आदेश दिले आहेत. तसेच पाच परवाने निलंबित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगीतले.

Web Title: 326 shops in western Vidarbha sell orders for sale!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.