३३ कोटींचे अंदाजपत्रक मंजुर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 02:15 AM2017-03-24T02:15:43+5:302017-03-24T02:15:43+5:30

अकोला जिल्हा परिषदेच्या ३३ कोटी २७ लाख ३३ हजार ७00 रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर.

33 crores budget approved! | ३३ कोटींचे अंदाजपत्रक मंजुर!

३३ कोटींचे अंदाजपत्रक मंजुर!

Next

अकोला, दि. २३- जिल्हा परिषदेच्या विविध योजनांसह इतर खर्चासाठी मिळून २0१७-१८ मध्ये ३३ कोटी २७ लाख ३३ हजार ७00 रुपयांचे अंदाजपत्रक गुरुवारी अर्थसंकल्पीय सभेत मंजूर करण्यात आले. त्यातून ३१ कोटी ३६ लाख २६ हजार ६00 रुपये खर्च होऊन १ कोटी ९१ लाख ७ हजार रुपये शिल्लक राहणार आहेत, असे जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांनी सांगितले.
अर्थसंकल्पातील तरतूद केलेल्या निधीत काही प्रमाणात फेरबदलाच्या सूचना मान्य करत सभेत मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागाला येत्या वर्षात लागणारा निधी, विभागाच्या खर्चासाठी प्रमुखांनी केलेल्या मागण्यांवरून अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. त्यामध्ये समाजकल्याण विभागासाठी ३,८४,३१000, अपंग लाभार्थींसाठी २८,२८000, कृषी विभाग-२,६४,८८000, महिला व बालकल्याण विभाग-२,८४,३४000, आरोग्य विभाग-१,१५,२४000, बांधकाम विभाग- ४,६४,0२000, शिक्षण विभाग- २,४५,३३६00, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग- ११,0७,५१000, पशूसंवर्धन विभाग-६0,२३000, लघुपाटबंधारे विभाग-२५,८६000 एवढी तरतूद करण्यात आली आहे. त्यातील विविध बाबींसाठी तरतूद केलेल्या निधीत काही प्रमाणात फेरबदल करण्याच्या सूचना सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, गोपाल कोल्हे, शोभा शेळके, प्रतिभा अवचार, सम्राट डोंगरदिवे यांनी मांडल्या. त्यानुसार फेरबदलाला मंजुरी देण्यात आली, तसेच सदस्यांनी मागणी केल्यानुसार नवीन उपक्रमांनाही मान्यता देण्यात आली.
शेतकर्‍यांसाठी पाच कोटींची मागणी
कृषी विभागाच्या विविध योजनांतून मोठय़ा प्रमाणात शेतकर्‍यांना लाभ देण्यासाठी किमान पाच कोटी रुपये या विभागाला देण्यात यावे, त्यासाठी कोणत्या योजनांमध्ये कपात करावी, त्याबाबतची सूचना चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी मांडली.
आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत द्या!
शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. त्या कुटुंबाना मदत देण्यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी सदस्या प्रतिभा अवचार यांनी केली. या कुटुंबाना उपजीविकेचे साधन मिळेल, अशी योजना राबवा, असे मत मांडले.
कुक्कुटपालनासाठी निधी द्या!
काही योजनांच्या तरतुदीमध्ये बदल सुचवत ती तरतूद इतर योजनांवर करण्याच्या सूचना शोभा शेळके यांनी मांडल्या. त्यामध्ये प्रामुख्याने कुक्कुटपालन, शालेय विद्यार्थ्यांना बुट पुरवठा करण्याची मागणी केली.
 

Web Title: 33 crores budget approved!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.