शहरात ३३१ जणांना काेराेनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:18 AM2021-04-11T04:18:47+5:302021-04-11T04:18:47+5:30
१०५३ जणांनी केली चाचणी शनिवारी १०५३ जणांनी चाचणी केंद्रात जाऊन नमुने दिले. यामध्ये ३३५ जणांनी आरटीपीसीआर चाचणी केली असून, ...
१०५३ जणांनी केली चाचणी
शनिवारी १०५३ जणांनी चाचणी केंद्रात जाऊन नमुने दिले. यामध्ये ३३५ जणांनी आरटीपीसीआर चाचणी केली असून, ७१८ जणांनी रॅपिड अँटिजन चाचणी केली आहे. या सर्व संशयितांचे अहवाल चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
झाेन अधिकाऱ्यांची दमछाक
शहराच्या कानाकाेपऱ्यात काेराेनाचे रुग्ण आढळून येत आहेत. काेराेनाचा संसर्ग पसरल्यामुळे मनपाने झाेननिहाय चाचणी केंद्रांसह फिरत्या वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पाॅझिटिव्ह रुग्णांवर लक्ष ठेवणे, संशयित रुग्णांना हाेमक्वारंटाइनची परवानगी देणे, चाचणी केंद्रांमध्ये जमा केलेले नमुने तपासणीसाठी पाठविणे व त्यानंतर पुन्हा पाॅझिटिव्ह रुग्णांची उपचारासाठी मनधरणी करणे अशा अनेक कामांचा ताण मनपाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर येत आहे.
...म्हणून बाधितांची संख्या वाढली !
शहरात दिवसेंदिवस काेराेनाबाधित व मृतांचा आकडा वाढत चालला आहे. तरीही अकाेलेकरांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना अकाेलेकर कमालीचे बेफिकीर आढळून येत आहेत. परिणामी रुग्णांची संख्या वाढत आहे. शनिवारी शहरात ३३१ जणांना काेराेनाची लागण झाली आहे. यामध्ये पूर्व झाेन अंतर्गत १५२, पश्चिम झोन ३९, उत्तर झोन ६२ आणि दक्षिण झोनअंतर्गत ७८ जणांचा समावेश आहे.