३४ हजार विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा

By admin | Published: March 18, 2015 11:30 PM2015-03-18T23:30:46+5:302015-03-18T23:30:46+5:30

शासनाची घोषणा; अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोल्यात.

34 thousand students get relief | ३४ हजार विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा

३४ हजार विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा

Next

बुलडाणा : अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी संबंधित कोणत्याही कामासाठी अमरावतीला जाण्याचे काम पडू नये, यासाठी विद्यापिठाचे उपकेंद्र अकोला येथे लवकरच सुरु करण्यात येणार आहे. तद्विषयक घोषणा शासनातर्फे मंगळवारी विधानसभेत करण्यात आली. त्यामुळे अमरावती विद्यापिठाशी संलग्न झालेल्या या तिन्ही जिल्ह्यातील विविध अभ्यासक्रमाच्या ३४ हजार ५४0 विद्यार्थ्यांंना दिलासा मिळाला आहे.
अमरावती विद्यापिठाचे उपकेंद्र अकोल्यात व्हावे, यासाठी तिन्ही जिल्ह्यातील विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था व संघटनांकडून अनेक वर्षापासून रेटून घरण्यात आली होती. विधीमंडळ अधिवेशनात मंगळवारी हा प्रश्न उपस्थित झाला आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला येथे सुरू करण्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी होकार दिला.
या विद्यापीठांतर्गत अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा जिल्ह्याचा विविध महाविद्यालयातून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांंना परीक्षा फॉर्म, शुल्क व इतर महत्त्वाच्या कागदपत्र आणि त्रुटींसाठी अमरावती गाठावे लागते. यासाठी विद्याथ्यार्ंना सुमारे २५0 ते ३00 किमीचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसानही होते. शासनाच्या या निर्णयाने विद्यार्थ्यांंना मोठा दिलासा मिळाला आहे.

*बुलडाण्याची मागणी दुर्लक्षीत
विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे या मागणीसाठी बुलडाणा जिल्ह्यातूनही व्यापक प्रमाणात चळवळ उभी राहिली होती. हे उपकेंद्र शेगाव किंवा खामगाव या ठिकाणी व्हावे, अशी मागणी होती; मात्र अकोला येथे उपकेंद्राची घोषणा झाल्यामुळे बुलडाण्याची मागणी दुर्लक्षीत राहिली. हे उपकेंद्र केवळ ह्यआवक जावकह्ण पुरते र्मयादीत राहु नये तर सर्वार्थाने प्रतिविद्यापीठ म्हणून कार्यरत होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.बाळासाहेब गावंडे यांनी व्यक्त केली.

विद्यापिठाशी संलग्न विद्यार्थी
बुलडाणा                     १0७00
अमरावती                   ४0५२७
अकोला                       १८३00
यवतमाळ                    १३३२८
वाशिम                          ५५४0

Web Title: 34 thousand students get relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.