शहरात ३४० जणांना काेराेनाची लागण; मनपा सैरभैर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:18 AM2021-03-14T04:18:24+5:302021-03-14T04:18:24+5:30
पूर्व, दक्षिण झाेन अनियंत्रित शहरात काेराेनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या पूर्व व दक्षिण झाेनमध्ये वाढली आहे. आजपर्यंत काेराेनाचे सर्वाधिक बाधित ...
पूर्व, दक्षिण झाेन अनियंत्रित
शहरात काेराेनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या पूर्व व दक्षिण झाेनमध्ये वाढली आहे. आजपर्यंत काेराेनाचे सर्वाधिक बाधित रुग्ण पूर्व व दक्षिण झाेनमध्ये आढळून येत आहेत. शनिवारीदेखील पूर्व झोनमध्ये काेराेनाचे ११० रुग्ण आढळून आले. तसेच पश्चिम झोनमध्ये ७५, उत्तर झोनमध्ये ५० व दक्षिण झोनमध्ये १०५ असे एकूण ३४० रुग्ण आढळून आले आहेत.
१११३ जणांनी केली चाचणी
काेराेनाची लक्षणे आढळून येणाऱ्या ५०५ नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी केली. तसेच ६०८ जणांनी रॅपिड ॲन्टिजेन चाचणी केली. शनिवारी एकूण १११३ जणांनी चाचणी केली. संबंधितांचे अहवाल पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.
मनपाचे पूर्व, दक्षिण झाेनकडे दुर्लक्ष
फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहरातील पूर्व व दक्षिण झाेनमध्ये काेराेनाची लागण हाेणाऱ्या रुग्ण संख्येत माेठी वाढ झाल्याचे समाेर आले आहे. या दाेन्ही झाेनमधील नागरिकांचे बेजबाबदार वर्तन, काेराेनाबद्दल कमी झालेली धास्ती काेराेनाच्या प्रसारासाठी पाेषक ठरली आहे. मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी उपराेक्त दाेन्ही झाेनमध्ये ठाेस उपाययाेजनांच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.