४८ तासांत ३४० वीजचोरी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:25 AM2021-02-26T04:25:00+5:302021-02-26T04:25:00+5:30

यामध्ये थेट वीजचोरी किंवा मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्यांची संख्या ही ३२६ आहे, तर १४ ग्राहकांनी ज्या कामासाठी ...

340 power thefts exposed in 48 hours | ४८ तासांत ३४० वीजचोरी उघड

४८ तासांत ३४० वीजचोरी उघड

Next

यामध्ये थेट वीजचोरी किंवा मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्यांची संख्या ही ३२६ आहे, तर १४ ग्राहकांनी ज्या कामासाठी विजेची मागणी केली होती त्यासाठी न वापरता इतर कामासाठी वापरत महावितरणची फसवणूक केली आहे. एकून १ लाख ५९ हजार २४१ युनिटच्या ( १६ लक्ष ६५ हजार रुपये) वीजचोरीत ग्राहकांनी दंडासहित रक्कम भरली नाही तर संबंधितावर विद्युत कायदा कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

थकबाकी वसूल न झाल्याने महावितरण आर्थिक अडचणीतून जात असताना वीजचोरांनी घातलेला धुमाकूळ महावितरणचे कंबरडे मोडणारा आहे. यापुढे महावितरण अकोला परिमंडलाअंतर्गत नियमित मोहिमा राबवित वीजचोरांवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहे.

Web Title: 340 power thefts exposed in 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.