उद्योग, व्यवसायांसाठी ३४५ कर्ज प्रकरणे

By admin | Published: August 11, 2014 12:29 AM2014-08-11T00:29:24+5:302014-08-11T00:56:37+5:30

प्राप्त झालेल्या ३४५ कर्ज प्रकरणांची छाननी जिल्हास्तरीय कार्यबल समितीकडून करण्यात आली आहे.

345 loan cases for businesses, businesses | उद्योग, व्यवसायांसाठी ३४५ कर्ज प्रकरणे

उद्योग, व्यवसायांसाठी ३४५ कर्ज प्रकरणे

Next

अकोला : नवीन उद्योग व व्यवसायांसाठी जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ आणि खादी ग्रामोद्योग आयोगाकडे प्राप्त झालेल्या ३४५ कर्ज प्रकरणांची छाननी जिल्हास्तरीय कार्यबल समितीकडून करण्यात आली आहे. विविध लहान-मोठे उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांना २५ लाखापर्यंत कर्ज दिले जाते. त्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांकडून जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ आणि खादी ग्रामद्योग आयोगाकडे कर्ज प्रकरणे सादर केली जातात. यावर्षी प्राप्त झालेल्या कर्ज प्रकरणांची छाननी जिल्हास्तरीय कार्यबल समितीच्या सभेत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी करण्यात आली. तसेच कर्ज प्रकरणे दाखल केलेल्या नवीन उद्योजक व व्यावसायिकांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. त्यामध्ये एकूण ३४५ कर्ज प्रकरणांची छाननी करण्यात आली असून, त्रुटी असलेल्या कर्ज प्रकरणांच्या प्रस्तावात दुरुस्ती करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. छाननी पूर्ण झालेल्या कर्ज प्रकरणांची यादी लवकरच जिल्हास्तरीय कार्यबल समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात येणार आहे.

Web Title: 345 loan cases for businesses, businesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.