‘एमआयडीसी’तील ३४६ कंत्राटी कर्मचारी स्थायी रोजगाराच्या प्रतीक्षेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 03:09 AM2017-07-27T03:09:42+5:302017-07-27T03:09:42+5:30

346 contract workers in MIDC waiting for permanent employment! | ‘एमआयडीसी’तील ३४६ कंत्राटी कर्मचारी स्थायी रोजगाराच्या प्रतीक्षेत!

‘एमआयडीसी’तील ३४६ कंत्राटी कर्मचारी स्थायी रोजगाराच्या प्रतीक्षेत!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत जॉब बेसिक रेटलिस्ट आणि कंत्राटी कर्मचाºयांची संख्या ३४६ झाली असून, हे कर्मचारी गत १९९० पासून या कार्यालयात कार्यरत आहेत. वयाची चाळिशी ओलांडलेल्या या कर्मचाºयांना अजूनही स्थायी स्वरूपात नोकरीवर कायम करण्यात आलेले नाही. आता या कर्मचाºयांनी शासन दरबारी स्थायी रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई याप्रकरणी कर्मचाºयांनी काय न्याय देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
राज्याच्या औद्योगिक विकास महामंडळात १९९० पासून नोकर भरती झालेली नाही, त्यामुळे जॉब बेसिक, रेटलिस्ट आणि कंत्राटी पद्धतीने राज्यात विविध पदांवर ३४६ कर्मचारी घेतले गेलेत. अकोला एमआयडीसीमध्येही अशा प्रकारचे १३ कर्मचारी आहेत. या सर्व कर्मचाºयांनी वयाची चाळिशी गाठली असून, त्यांना आता दुसरी नोकरीदेखील मिळणे कठीण आहे.१५ ते २० वर्ष या विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाºया या कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्यात यावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने २९ मार्च २०१६ च्या संचालकीय मंडळाच्या ३६६ व्या बैठकीत याबाबतचा ठरावही संमत केला आहे. या घटनेला एक वर्ष झाले असून, वरिष्ठ अधिकाºयांच्या दिरंगाईमुळे कारवाई रखडली आहे.

२० वर्षांची सेवा आणि कर्मचाºयांच्या वयाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना अंशत: अस्थायी स्थापनेवर नेमणूक करावी, अशी विनंती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना केली आहे.
-गोवर्धन शर्मा,आमदार, अकोला पश्चिम.

Web Title: 346 contract workers in MIDC waiting for permanent employment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.