३०० रुपयांच्या अनुदानासाठी ३५० रुपयांचा खर्च; सोयाबीनच्या परमिटसाठी शेतकऱ्यांना भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 04:00 PM2018-06-08T16:00:53+5:302018-06-08T16:00:53+5:30

 मूर्तिजापूर: शासकीय अनुदानावर मिळणाºया सोयाबीनच्या एका ३० किलो बॅगेचे परमिट मिळविण्यासाठी मुर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ७ जून रोजी मोठी गर्दी करीत आहेत.

350 rupees spent for the subsidy of 300 rupees | ३०० रुपयांच्या अनुदानासाठी ३५० रुपयांचा खर्च; सोयाबीनच्या परमिटसाठी शेतकऱ्यांना भुर्दंड

३०० रुपयांच्या अनुदानासाठी ३५० रुपयांचा खर्च; सोयाबीनच्या परमिटसाठी शेतकऱ्यांना भुर्दंड

Next
ठळक मुद्दे३०० रुपये अनुदानाचे परमिट मिळविण्यासाठी तालुक्यातील शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रचंड गर्दी केली होती शेतकरी एक बॅग सोयाबीनसाठी गत तीन दिवसांपासून कृषी अधिकारी कार्यालयात चकरा मारत आहेत. येण्याजाण्यासह शंभर रुपये तर सातबारासाठी किमान ५० रुपये खर्च येत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

- संजय उमक

 मूर्तिजापूर: शासकीय अनुदानावर मिळणाºया सोयाबीनच्या एका ३० किलो बॅगेचे परमिट मिळविण्यासाठी मुर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ७ जून रोजी मोठी गर्दी करीत आहेत. शेतकºयांना सोयाबीनच्या एका बॅगवर ३०० रुपयांचे अनुदान मिळत असले तरी त्यासाठी शेतकºयांना ३५० रुपयांचा खर्च होत असल्याचे चित्र आहे. शिवाय परमिट घेण्यासाठी वेळेचा अपव्ययही होत आहे.
शासन अनुदानावर मिळणाºया सोयाबीनच्या बॅगची किंमत १,३५० रुपये तर बाजारात मिळणाºया सोयाबीन बॅगची किंमत १,७५० असल्याने केवळ ३०० रुपये अनुदानाचे परमिट मिळविण्यासाठी तालुक्यातील शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रचंड गर्दी केली होती. त्यासाठी रोज २५ ते ३० किलोमीटर अंतरावरील शेतकरी एक बॅग सोयाबीनसाठी गत तीन दिवसांपासून कृषी अधिकारी कार्यालयात चकरा मारत आहेत. येण्याजाण्यासह शंभर रुपये तर सातबारासाठी किमान ५० रुपये खर्च येत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. एकंदरीत ३५० रुपयांचा भुर्दंड बसत असल्याची शोकांतिका उपस्थित शेतकºयांनी व्यक्त केली आहे. त्यातही प्रत्येक दिवशी किमान २०० रुपये मजुरी पाडून येथे येत असल्याचे उपस्थित शेतकºयांनी सांगितले. अनुदान तत्त्वावर मिळणारे सोयाबीन एका दिवसात मिळाले तर शेतकºयांना आर्थिक भुर्दंड बसणार नाही याची काळजी कृषी अधिकारी कार्यालयाने घेणे गरजेचे आहे आहे.  


 संपूर्ण तालुक्यासाठी ३ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध झाले असून, आजपर्यंत आम्ही पंधराशे क्विंटल बियाण्यांचे वाटप केले आहे. सुरुवातीला काही शेतकºयांनी आमची दिशाभूल केली आहे. एकाच सातबारावर दोन-दोन वेळा बियाणे उचलले असल्याने लक्षात आल्याने सर्व शहानिशा करूनच परमिट वाटप करण्यात येत आहे म्हणून थोडा विलंब लागत आहे.
- चंदन जगन्नाथ निंघोट
तालुका कृषी अधिकारी (प्रभारी) मूर्तिजापूर

 गत तीन दिवसांपूर्वी मी या कार्यालयात सात-बारा व आधार कार्डची सत्यप्रत जमा केली आहे. रोज चकरा मारूनही ३ दिवसापासून अजूनही मला परमिट मिळाले नाही. यासाठी माझा मजुरीसह ८०० रुपये खर्च झाला आहे. कृषी अधिकारी कार्यालयाने तत्परता दाखविली असती तर मला हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला नसता.
- संजय अजाबराव बांबल, शेतकरी, शिराताळा
 

 

Web Title: 350 rupees spent for the subsidy of 300 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.