अकोला तालुक्यात ३६३ घरांची पडझड ; नुकसानाचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 02:09 PM2018-06-03T14:09:10+5:302018-06-03T14:09:10+5:30
अकोला: वादळी वाºयासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात शुक्रवारी अकोला तालुक्यातील ३६३ घरांची पडझड झाली असून, घरांच्या अंशत: नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शनिवारी अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.
अकोला: वादळी वाºयासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात शुक्रवारी अकोला तालुक्यातील ३६३ घरांची पडझड झाली असून, घरांच्या अंशत: नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शनिवारी अमरावती विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.
वादळी वाºयासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात शुक्रवार, १ जून रोजी हजेरी लावली. वादळी वाºयासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात अकोला तालुक्यातील चांदूर, सोमठाणा, हिंगणा म्हैसपूर, शिवणी, आगर व पाळोदी इत्यादी गावांमध्ये ३६३ घरे आणि एका गोठयाचे अंशत: नुकसान झाले. काही घरांच्या छतावरील टिनपत्रे उडाली तर काही घरांचे कवेलूंची तूटफूट झाली. वादळी वाºयासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात अकोला तालुक्यातील ३६३ घरे व एक गोठ्याचे अंशत: नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २ जून रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला.
गावनिहाय घरांचे अंशत: असे आहे नुकसान!
गाव घरे
चांदूर २६८
सोमठाणा ५
हिंगणा म्हसपूर ४
शिवणी ७२
आगर १४
पाळोदी ०३
......................................
एकूण ३६३
नुकसानाचे पंचनामे!
वादळी वाºयासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात अकोला तालुक्यात घरांच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम संबंधित तलाठी व ग्रामसेवकांमार्फत शनिवारी सुरू करण्यात आले.