शेतकऱ्यांसाठी ३६.७९ कोटींची मदत वितरित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 02:06 PM2020-02-05T14:06:55+5:302020-02-05T14:07:04+5:30
. वितरित मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयांमार्फत लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी मदत वाटपाच्या तिसºया टप्प्यात प्राप्त झालेली ३६ कोटी ७९ लाख ४६ हजार रुपये मदतीची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सोमवार, ४ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली आहे. वितरित मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयांमार्फत लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी शासन निर्णयानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी २९७ कोटी ९४ लाख ३० हजार रुपये मदत निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार शेतकºयांना मदत वाटप करण्याच्या दोन टप्प्यात शासनामार्फत प्राप्त झालेली २३१ कोटी १० लाख ५८ हजार रुपयांची मदत जिल्ह्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असून, मदत वाटपाच्या तिसºया टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी ३६ कोटी ७९ लाख ४६ हजार रुपयांची मदत शासनामार्फत १ फेबु्रवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार उपलब्ध मदतीची रक्कम ४ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली असून, मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयांमार्फत लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
आणखी हवे २४ कोटी!
अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी तिसºया टप्प्यात ६० कोटी ८३ लाख ७७ हजार रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली होती. त्यापैकी ३६ कोटी ७९ लाख ४६ हजार रुपयांची मदत शासनाकडून उपलब्ध झाली असली तरी जिल्ह्यातील शेतकºयांना मदतीचे वाटप करण्यासाठी आणखी २४ कोटी ४ लाख ३१ हजार रुपयांचा निधी उपलब्ध होण्याची गरज आहे.
तालुकानिहाय वितरित मदतीची रक्कम!
अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना मदत वाटपासाठी तिसºया टप्प्यात ३६ कोटी ७९ लाख ४६ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली.
- अकोला तालुका -६ कोटी ७६ लाख ५५ हजार रुपये,
- बार्शीटाकळी तालुका -५ कोटी ६७ लाख ९० हजार रुपये,
- अकोट तालुका -७ कोटी ५१ लाख ७८ हजार रुपये,
- तेल्हारा तालुका -६ कोटी ६२ लाख ८२ हजार रुपये,
- बाळापूर तालुका -६ कोटी ४७ लाख ५० हजार रुपये,
- पातूर तालुका -३ कोटी ३८ लाख ९१ हजार रुपये
- मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकºयांसाठी ३४ लाख रुपये