घरचे बियाणे वापरल्याने शेतकऱ्यांचे वाचले ३७ कोटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 10:13 AM2020-08-25T10:13:29+5:302020-08-25T10:13:40+5:30
जिल्ह्यात जवळपास ६० हजार हेक्टर क्षेत्रफळावर घरचे बियाणे पेरल्याने शेतकºयांची तब्बल ३७.५ कोटी रुपयांची बचत झाली आहे.
- प्रवीण खेते
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : यंदाच्या खरीप हंगामात पेरलेले बियाणे न उगवल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले; मात्र त्याच सोबत असेही काही शेतकरी आहेत ज्यांनी कंपन्यांचे नाही, तर घरचे बियाणे पेरले आहेत. जिल्ह्यात जवळपास ६० हजार हेक्टर क्षेत्रफळावर घरचे बियाणे पेरल्याने शेतकºयांची तब्बल ३७.५ कोटी रुपयांची बचत झाली आहे.
यावर्षी मान्सून वेळेवर आल्याने बहुतांश शेतकºयांनी पहिल्याच पावसात पेरण्या आटपून घेतल्या; मात्र पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याने शेतकºयांवर मोठे संकट ओढवले. शेतकºयांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाकडून बियाणे कंपन्यांसह बियाणे विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करत आहेत. जिल्ह्यात शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले, तरी जिल्ह्यातील असेही काही शेतकरी आहेत ज्यांची मोठी बचत झाली आहे. जिल्ह्यात एकूण २ लाख १० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यापैकी ६० हजार हेक्टर क्षेत्रफळावर शेतकºयांनी घरचे बियाणे पेरले आहेत. इतर कंपन्यांचे बियाणे उगवले नसले, तरी ज्या शेतकºयांनी घरचे बियाणे पेरले त्यांचे नुकसान झाले नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे ६० हजार हेक्टरवर घरचे बियाणे पेरलेल्या शेतकºयांचे तब्बल ३७.५ कोटी रुपये वाचल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
बहुतांश तक्रारी मध्य प्रदेशातील बियाण्यांविरोधात!
ज्या शेतकºयांनी घरचे बियाणे पेरले त्यांचे बियाणे उगवले, मग बाजारातून घेतलेले बियाणे का उगत नाही, असा प्रश्न उपस्थित करत बहुतांश तक्रारी या मध्य प्रदेशातील बियाण्यांविरोधात असल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाºयांनी दिली. त्यामुुळे अशा बियाणे कंपन्यांसोबतच त्याची विक्री करणाºयांवरदेखील कारवाई होणारच, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात एकूण पेरणीतील ६० हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकºयांनी घरचे बियाणे पेरले आहेत. त्यामुळे त्यांचे तब्बल ३७.५ कोटी रुपयांची बचत झाली आहे. या संदर्भात कृषी विभागाकडे दस्तऐवज आहेत; मात्र ज्यांचे बियाणे उगवले नाही, ते बहुतांश मध्य प्रदेशातील कंपन्यांचे आहेत. त्या विरोधात कृषी विभाग संबंधितांवर कारवाई करत आहे.
- मोहन वाघ, जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी विभाग, अकोला