निवडणूक प्रशिक्षणाला ३७ कर्मचाऱ्यांची दांडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 01:16 PM2019-12-23T13:16:22+5:302019-12-23T13:16:34+5:30

सोमवारी निवडणूक निर्णय अधिकाºयांमार्फत कारणे दाखवा (शो-कॉज) नोटीस बजावण्यात येणार असून, स्पष्टीकरण मागविण्यात येणार आहे.

37 Employees skip Election related trening in Akola | निवडणूक प्रशिक्षणाला ३७ कर्मचाऱ्यांची दांडी!

निवडणूक प्रशिक्षणाला ३७ कर्मचाऱ्यांची दांडी!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी अकोला तालुक्यातील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात निवडणूक प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये ३७ कर्मचाºयांनी अनुपस्थित राहून निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारली. संबंधित कर्मचाºयांना सोमवारी निवडणूक निर्णय अधिकाºयांमार्फत कारणे दाखवा (शो-कॉज) नोटीस बजावण्यात येणार असून, स्पष्टीकरण मागविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अकोला तालुक्यात २२५ मतदान पथके गठित करण्यात आली असून, त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून ९०० कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. तालुक्यातील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांना २३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात दोन सत्रात निवडणूक प्रशिक्षण देण्यात आले. उपस्थित मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांना अकोल्याचे तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय लोखंडे यांनी मतदान प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन केले. या निवडणूक प्रशिक्षणात तालुक्यातील ८६३ मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांनी सहभाग घेतला.
उर्वरित ३७ कर्मचाºयांनी अनुपस्थित राहून निवडणूक प्रशिक्षणाला दांडी मारली. संबंधित कर्मचाºयांना २३ डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकाºयांमार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून, त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात येणार आहे.


जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहिलेल्या अकोला तालुक्यातील ३७ कर्मचाºयांना सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून, त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात येणार आहे.
- विजय लोखंडे,
तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अकोला.

 

Web Title: 37 Employees skip Election related trening in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.