चार महिन्यांत ३७ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:18 AM2021-05-12T04:18:52+5:302021-05-12T04:18:52+5:30
अकोला : कोरोना काळात जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आलेख वाढत असतानाच जानेवारी ते एप्रिलअखेर या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ...
अकोला : कोरोना काळात जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आलेख वाढत असतानाच जानेवारी ते एप्रिलअखेर या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करीत जीवनयात्रा संपविली. त्यामुळे कोरोना काळातही जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याचे वास्तव समोर येत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गत जानेवारी महिन्याच्या अखेरपासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, कोरोनामुळे मृत्यूचा आलेखही वाढतच आहे. त्यामध्ये कोरोना काळात जानेवारी ते एप्रिलअखेरपर्यंत या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. कोरोना काळात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यासह विविध उपाययोजना शासन व प्रशासनामार्फत करण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्येत वाढ होत असतानाच कोरोना काळात गत चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ३७ शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. त्यानुषंगाने कोरोना काळातही शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे.
दोन वर्षांतील जानेवारी ते एप्रिलअखेरपर्यंत
शेतकरी आत्महत्यांची अशी आहे आकडेवारी!
वर्ष महिना आत्महत्या
२०२० जानेवारी १६
फेब्रुवारी १७
मार्च ०७
एप्रिल ०४
..............................................................
एकूण ४४
वर्ष महिना आत्महत्या
२०२१ जानेवारी ०९
फेब्रुवारी १४
मार्च ०९
एप्रिल ०५
.............................................................
एकूण ३७