जिल्ह्यात ३७ हजार शेतकऱ्यांनी केली पीक पेऱ्याची नोंदणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:23 AM2021-09-06T04:23:45+5:302021-09-06T04:23:45+5:30
शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘ई पीक पाहणी’ कार्यक्रमाची जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. ‘ई-पीक ...
शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘ई पीक पाहणी’ कार्यक्रमाची जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. ‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रमात शेतकऱ्यांनी मोबाइलमधील ‘ई-पीक पाहणी ’ ॲपव्दारे शेतातील पीक पेऱ्याची माहिती नोंदविणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून शेतातील पीक पेऱ्याची नोंदणी सुरु केली आहे. जिल्ह्यात शेतजमिनीचा सात बारा असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २ लाख ४० हजार असून, त्यापैकी ४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील ३७ हजार शेतकऱ्यांनी ‘ई-पीक पाहणी’ मोबाइल ॲपव्दारे शेतातील पीक पेऱ्याची नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतांमधील पीक पेऱ्याची नोंदणी येत्या १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा महसूल प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
‘ई- पीक पाहणी’ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत ४ सप्टेंबर जिल्ह्यात ३७ शेतकऱ्यांनी शेतातील पीक पेऱ्याची नोंदणी ‘ई- पीक पाहणी ’ मोबाइल ॲपमध्ये केली आहे. जिल्ह्यात शेतजमिनीचा सात बारा असलेल्या सर्व २ लाख ४० हजार शेतकऱ्यांच्या शेतांमधील पीक पेऱ्याची नोंदणी करण्याचे काम येत्या १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
जी.डब्ल्यू.सुरंजे
उपजिल्हाधिकारी (महसूल), अकोला.