कोरोनामुळे महिन्याभरात ३७६ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:13 AM2021-07-08T04:13:57+5:302021-07-08T04:13:57+5:30
अकोला: जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. मे महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला होता. या महिन्यात कोरोनामुळे तब्बल ...
अकोला: जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. मे महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला होता. या महिन्यात कोरोनामुळे तब्बल ३७६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जून महिन्यात मात्र कोरोनाचा संसर्ग कमी झाला.
-----------------------------
मनपा सेंटर्सवर ५५९ नागरिकांचे स्वॅब
अकोला: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात होत असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर जास्त प्रभावीपणे नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाद्वारे झोननिहाय सुरू असलेल्या कोविड १९ चाचणी केंद्रावर शहरातील एकूण ५५९ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले होते.
----------------------------------
जिल्ह्यात एक लक्ष ७९ हजार १८७ चाचण्या
अकोला: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोविड १९ची चाचणी होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लक्ष ७९ हजार १८७ चाचण्या झाल्या. यापैकी १४ हजार ४२० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
-------------------------------------------
रेतीचे अवैध उत्खनन, पोलिसांची कारवाई
अकोला: नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून, अवैध वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या दहशतवादविरोधी पथकाने दोन वाहने पकडली.
-------------------------------------------
लोणी शिवारात हरीण जखमी
अकोला: लोणी शेतशिवारात हरीण जखमी अवस्थेत आढळले. ही माहिती नागरिकांना कळली. त्यांनी तत्काळ जखमी अवस्थेत असलेल्या हरणाला वनविभागाच्या स्वाधीन केले. लोणी मार्गावर कुत्र्यांच्या हल्ल्यात हरिण जखमी झाली होती.
----------------------------
आला पावसाळा कुटुंबाचे आरोग्य सांभाळा
अकोला : पावसाळा सुरू झाल्यामुळे कुटुंबाचे आरोग्य सांभाळण्यासाठी महिलांची जबाबदारी वाढलेली आहे. अनेक आजारांना पावसाळ्यातच पेव फुटते. त्यामुळे दवाखान्यात जाण्याची वेळ कुटुंबातील सदस्यांवर येते. पावसाळ्याच्या दिवसात आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे.
-----------------------------