चांगेफळ पैसाळी हल्ला प्रकरणातील ३८ आरोपींना जामीन
By admin | Published: October 28, 2016 03:07 AM2016-10-28T03:07:57+5:302016-10-28T03:07:57+5:30
पोलिसांनी केली होती ४५ आरोपींना अटक.
अकोला, दि. २७- बाश्रीटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुनर्वसित गाव असलेल्या सुकळी पैसाळी येथे महापुरुषाच्या प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर एका गटाने पुनर्वसित गाव असलेल्या चांगेफळ पैसाळी गावातील घरांवर सशस्त्र हल्ला करणार्या ४५ आरोपींना पोलिसांनी अटक केली. यातील ३८ आरोपींना गुरुवारी विशेष न्यायालयाचे प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांनी जामीन मंजूर केला.
महापुरुषाच्या प्रतिमेची विटंबना झाल्यानंतर चांगेफळ पैसाळी गावावर सुकळी पैसाळी या गावातील १00 वर जणांनी हल्ला चढविला. यातील विजय बाबुलाल जाधव, संजय भीमराव जाधव, विजय चरणदास जाधव, उमेश देवमन जाधव, देवेंद्र रवींद्र जाधव, सुरेंद्र शिवलाल जाधव, रवी प्रकाश जाधव, देवलाल मुकिंदा डोंगरे, भास्कर कोपुर्डा जाधव, नाजूक साहेबराव जाधव, राष्ट्रपाल शालीग्राम वानखडे, मंगेश अनिल वानखडे, भास्कर शिवदास जाधव, मुकुं दा सहदेव जाधव, उमेश पंजाब जाधव, शुभम विलास जाधव, अतुल अभिमन्यू गवई, भाऊराव बाबुराव जाधव, अमर दिनकर जाधव, मंगेश सुरेश जाधव, संदीप गुलाब जाधव, प्रमोद मेंबर जाधव, योगेश अशोक जाधव, मंगेश देवगन जाधव, महादेव यशवंत डोंगरे, परोजित संतोष जाधव, नीरज बाळकृष्ण जाधव, संतोष परसराम शेगोकार, बाळकृष्ण परसराम शेगोकार, नर्मदा लक्ष्मण जावळे आणि माया संजय इंगळे यांना पोलिसांनी अटक केली.
आरोपींनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. गुरुवारी विशेष न्यायालयाचे प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांच्याकडे सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे अँड. प्रवीण तायडे, अँड. चंद्रकांत वानखडे, अँड. देवानंद गवई आदींनी बाजू मांडली.