‘जलयुक्त शिवार’ कामांचे ३८ हजारांवर छायाचित्रे ‘अपलोड’

By admin | Published: August 25, 2015 01:50 AM2015-08-25T01:50:50+5:302015-08-25T01:50:50+5:30

राज्यात ३३ हजार कामांची ‘मोबाइल’द्वारे काढली छायाचित्रे.

38,000 uploaded photos of 'Jalakit Shivar' work | ‘जलयुक्त शिवार’ कामांचे ३८ हजारांवर छायाचित्रे ‘अपलोड’

‘जलयुक्त शिवार’ कामांचे ३८ हजारांवर छायाचित्रे ‘अपलोड’

Next

संतोष येलकर/अकोला: जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यात २१ ऑगस्टपर्यंंत ३२ हजार ९४६ कामांची मोबाइलद्वारे काढण्यात आलेली ३८ हजार ६२ छायाचित्रे मोबाइल अँपद्वारे शासनाच्या ह्यजलयुक्त वेबसाईटह्णवर अपलोड करण्यात आली आहेत. राज्यात वारंवार उद्भवणार्‍या पाणी टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी गत जानेवारीपासून राज्यात जलयुक्त शिवार अभियानाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासनामार्फत राबविण्यात येत आहे. नदी-नाल्यांचे खोलीकरण, नाल्यांचे सरळीकरण, शेततळी, नदी-नाल्यांमधील गाळ काढणे, सिमेंट बंधारे, शेततळी, ढाळीचे बांध, चर काढणे, विहिरींचे पुनर्भरण व इतर प्रकारची जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यात सर्व जिल्ह्यात सुरू झालेल्या व कामांच्या स्थितीबाबत शासनासह जनतेला सचित्र अद्ययावत माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी संबंधित यंत्रणेमार्फत मोबाइलद्वारे कामांचे छायाचित्र काढून, ते शासनाच्या जलयुक्त वेबसाईटवर टाकण्याचे (अपलोड) काम गेल्या फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले आहे. राज्यातील एकूण १ लाख ३ हजार ५९0 कामांपैकी २१ ऑगस्टपर्यंंत ३२ हजार ९४६ कामांचे ३८ हजार ८२ छायाचित्र संबंधित यंत्रणांच्या क्षेत्रीय अधिकार्‍यांमार्फत मोबाइल अँपद्वारे काढण्यात आली. मोबाइल अँपद्वारे काढण्यात आलेली ही छायाचित्र शासनाच्या ह्यजलयुक्त वेबसाईटह्णवर अपलोड करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांची मोबाइलद्वारे छायाचित्रे काढून ती शासनाच्या जलयुक्त वेबसाईटवर टाकण्यात येत आहेत. कृषी, सिंचन, वन, सामाजिक वनीकरण विभागाच्या क्षेत्रीय अधिकार्‍यांमार्फत कामांचे छायाचित्र अपलोड करण्यात येत असल्याचे उपजिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी सांगीतले.

Web Title: 38,000 uploaded photos of 'Jalakit Shivar' work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.